भारतीय पदार्थांची खरी ओळख म्हणजे त्यांना दिलेली मस्त चमचमीत फोडणी. डाळ, कढी, आमटी असो किंवा भाजी, फोडणी दिली की संपूर्ण घर सुगंधाने भरून जाते (ghee vs refined oil for tadka) आणि भूक दुपट्टीने वाढते. फोडणीमुळे पदार्थाला (which is better for tadka ghee or refined oil) चव, सुगंध आणि पौष्टिकता मिळते. शक्यतो कोणत्याही पदार्थांना फोडणी देण्यासाठी आपण तेल किंवा साजूक तुपाचा वापर करतो. फोडणीसाठी तेल आणि साजूक तूप यांचा वापर करताना, या दोघांपैकी फोडणीसाठी नेमकं काय चांगलं असा प्रश्न पडतो(health benefits of ghee tadka vs oil tadka).
काहीजणांच्या मते, तेलाचा वापर करावा किंवा काहींच्यामते तेलाची फोडणी द्यावी. आरोग्याच्या दृष्टीने तुपाची फोडणी चांगली की तेलाची अशी शंका मनात येते. अशा परिस्थितीत, तुपाच्या फोडणीचे फायदे आणि तोटे काय आहेत, त्याचा आपल्या पचनसंस्थेवर आणि आरोग्यावर कसा परिणाम होतो, आणि याबद्दल आयुर्वेदाचे मत काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. chatterbitespodcast2.0's या इंस्टाग्रामवरील अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी साजूक तूप चांगले की तेल ते पाहूयात...
पदार्थाला फोडणी देण्यासाठी साजूक तूप चांगले की तेल ?
१. साजूक तुपाची फोडणी देण्याचे फायदे...
१. भारतात तूप शतकानुशतके सुपरफूड मानले जाते.
२. तुपाची फोडणी दिल्याने पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो.
३. तूप सहज पचते आणि शरीराला त्वरित ऊर्जा देते.
४. साजूक तुपात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असतात, जे हाडे आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
५. तुपाची फोडणी देऊन तयार झालेले अन्न पचनशक्ती सुधारते आणि गॅस, ॲसिडिटीसारख्या समस्यां कायम दूर ठेवते.
६. लहान मुले आणि वृद्धांसाठी तुपाची दिलेली फोडणी पौष्टिक आणि पचायला हलकी मानली जाते.
डायबिटीस राहील नियंत्रणात, फक्त फॉलो करा १०-१०-१० चा नियम - पोषणतज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी कराच...
२. साजूक तुपाची फोडणी देण्याचे तोटे...
१. तुपाचा स्मोक पॉइंट तेलाच्या तुलनेत थोडा कमी असतो. साजूक तूप जास्त गरम केल्यास ते लगेच जळू शकते आणि त्यात हानिकारक घटक तयार होऊ शकतात.
२. जास्त प्रमाणात तुपाची फोडणी दिलेले पदार्थ वारंवार खाल्ल्याने लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉल वाढू शकते.
३. हार्ट प्रॉब्लेम किंवा रक्तदाब असलेल्यांनी साजूक तूप मर्यादित प्रमाणातच खावे.
४. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात साजूक तुपाची फोडणी दिलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरात अधिक उष्णता निर्माण होऊ शकते.
३. तेल आणि साजूक तुपाच्या फोडणीतील फरक...
१. तेल (विशेषतः रिफाइंड तेल) जास्त तापमानावरही स्थिर राहते, तर तूप लवकर जळते.
२. मोहरी, तीळ किंवा शेंगदाणा तेल देखील आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु रिफाइंड तेलाच्या तुलनेत तूप अधिक नैसर्गिक आणि पौष्टिक आहे.
३. चवीबद्दल बोलायचे झाल्यास, तुपात दिलेली फोडणी अधिक सुगंधी आणि उत्कृष्ट लागते.
४. फोडणी कधी आणि कशी द्यावी ?
१. आयुर्वेदानुसार, तुपाची फोडणी तेव्हाच द्यावी जेव्हा साजूक तूप मंद आचेवर गरम केलेलं असेल.
२. तूप गॅसची आच मोठी करुन जाळू नका. तूप थोडे गरम झाल्यावर त्यात जिरे, हिंग, मोहरी किंवा कढीपत्ता घालून फोडणी लगेच डाळ किंवा भाजीत मिसळा.
३. जर पचनशक्ती कमजोर असेल, तर तुपाची फोडणी दिलेले अन्नपदार्थ खाणे खूप फायदेशीर मानले जाते.
४. ज्या लोकांना हृदयाचा आजार, लठ्ठपणा किंवा हाय कोलेस्टेरॉल आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुपाचे प्रम,प्रमाण ठरवून खावे.
५. थंडीच्या दिवसांत तुपाची फोडणी जास्त फायदेशीर असते, कारण ती शरीराला ताकद आणि उष्णता देते.