Join us

प्रेशर कुकरमध्ये फक्त ५ मिनिटांत करा रवाळ तूप; दोन शिट्ट्या करताच कढवलेलं तूप तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:06 IST

Ghee Making In Cooker( Cooker madhye tup Kas Banvtat) : तूप करण्यासाठी मलई तासनतास मंद आचेवर शिजवावी लागते. ज्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जातात

तुपानं ( Desi Ghee) जेवणाला एक वेगळीच चव येते. तब्येतीच्या दृष्टीनंही तुपाचे बरेच फायदे आहेत. पण तूप नेहमी नेहमी बाहेरून आणणं बरोबर नाही कारण बाहेरचं तूप हे भेसळयुक्त असू शकता. (Cooking Hacks) तूप बनवण्याची प्रक्रिया ही लांबलचक आणि थकवणारी आहे. तूप करण्यासाठी मलई तासनतास मंद आचेवर शिजवावी लागते. ज्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जातात. याशिवाय तूप करताना स्वयंपाकघरातून सगळीकडे जो वास पसरतो तो कोणालाही आवडत नाही. (How To Make Ghee in Cooker At Home)

तुम्हालाही तूप घरी बनवण्याचा कंटाळा येत असेल हा लेख तुमच्यासाठीच घरच्याघरी सोप्या पद्धतीनं ते ही कमी वेळात तूप कसं बनवायचं ते पाहूया. सोशल मीडियावरील प्रसिद्ध शेफ मंजू मित्तल यांनी एक कमालीची ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकच्या मदतीनं ५ ते१० मिनिटांत प्रेशर कुकरमध्ये मलाईपासून साजूक तूप बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. (How To Make Ghee In Pressure Cooker)

पहिली स्टेप

सगळ्यात आधी फ्रिजमध्ये साठवून ठेवलेली साय बाहेर काढून ठेवा. ही साय ताजी असायला हवी आणि यातून कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येणार नाही याची काळजी घ्या. नंतर कुकरमध्ये थोडं पाणी घालून नंतर मलईसुद्धा घाला. असं केल्यानं साय कुकरला चिकटण्याचं टेंशन राहणार नाही.

(मोदक फाटतात-कडक होतात? उकड काढताना 3 गोष्टी करा, सुबक-मऊसूत, कळीदार होतील)

दुसरी स्टेप

कुकरमध्ये पाणी आणि साय घातल्यानंतर व्यवस्थित मिसळून घ्या. कुकर गॅसवर ठेवल्यानंतर साय आणि पाणी मिसळून शिजवून घ्या. मग कुकरचं झाकण लावून २ ते ३ शिट्ट्या येईपर्यंत वाट पाहा. त्यानंतर गॅस बंद करून शिट्टी काढून टाका.

तिसरी स्टेप

शिट्टी घेतल्यानंतर कुकरचं झाकण उघडून थोडावेळ असंच शिजू द्या. साय व्यवस्थित वितळल्यानंतर तूप आणि मावा वेगळे होऊ लागेल. नंतर एका काचेच्या भांडयात गाळून साठवून ठेवू शकता. याव्यतिरिक्त खव्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ बनवू शकता.

या पद्धतीचे फायदे काय

पारंपारीक पद्धतीनं तूप बनवायला जवळपास 40 मिनिटं लागतात. कुकरमध्ये तुम्ही 10 मिनिटांत बनवू शकता. तासनतास कढईजवळ उभं राहून मलई चाळत बसावं लागणार नाही. कुकरमध्ये आपोआप होत राहील. या पद्धतीनं बनवलेलं तूप स्वादीष्ट तसंच सुगंधित होते. (टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा)

तूप बनवण्यासाठी नेहमी ताज्या मलईचा वापर का. साय खूप जुनी असेल तर तुपाला कडवट वास येईल. कुकरमध्ये साय घालण्याआधी थोडं पाणी घालायला विसरू नका. नाहीतर कुकर साफ करण्याचं काम वाढेल. कुकरमध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण उघडा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न