दिवाळीच्या (Diwali 2025) दिवसांत त्याच त्या भाज्या, तेच पदार्थ खायला नको वाटतं. अशावेळी तुम्ही जेवणाची चव वाढवणाऱ्या भाज्या करू शकता. शेवची भाजी हा उत्तम पर्याय आहे. शेवची भाजी (Shev Bhaji Recipe) चवीला उत्तम लागते. तसंच भात, चपाती किंवा भाकरी कशाहीसोबत खाऊ शकता. ही भाजी घरी करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील ज्यामुळे भाजी ढाबास्टाईल होईल. गावरान पद्धतीची शेवची भाजी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Shev Bhaji At Home)
शेवची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
तेल: 3-4 चमचे (आवश्यकतेनुसार)
कांदा लसूण मसाला/गरम मसाला: 2 चमचे (चवीनुसार)
लाल तिखट: २ ते ३ चमचा (रंग व तिखटपणानुसार)
हळद: १ चमचा
पाणी- २ ते ३ वाट्या
मीठ: चवीनुसार
जाड शेव गाठी शेव- अर्धी वाटी
कोथिंबीर: बारीक चिरलेली
सुके खोबरे: १ वाटी (किसलेले)
कांदे: 2 (मध्यम, उभे चिरलेले)
लसूण पाकळ्या: 10-12
आले: 1 इंच
तेल: 1 चमचा
शेवच्या भाजीची सोपी रेसिपी
मंद आचेवर २ ते ३ चमचा तेलात कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्याच तेलात सुके खोबरे हलके तपकिरी रंगावर भाजून घ्या.कांदा, खोबरे, आले आणि लसूण एकत्र करून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईत ३ ते ४ चमचे तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर गॅस मंद करून त्यात हळद, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट घालून लगेच तयार केलेले वाटण घाला.हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या. वाटण भाजून झाल्यावर त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
भाजीला एक चांगली उकळी येऊ द्या. आवश्यक वाटल्यास अजून पाणी घालून रस्सा हवा तसा पातळ किंवा घट्ट ठेवा. गरमगरम रस्सा एका बाऊलमध्ये काढून घ्या.
खाण्याच्या ऐनवेळी त्यात जाड शेव किंवा गाठी शेव घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी, चपातीसोबत शेवची भाजी सर्व्ह करा.