सध्याच्या (Winter Special Recipes) गुलाबी थंडीत गरमागरम आणि चविष्ट पावटा भात खाण्याची मजाच काही वेगळी. बाजारात पावट्याच्या शेंगा बऱ्याच दिसून येतात. ताज्या पावट्यांचा वापर करून तुम्ही चमचमीत पावटा भात बनवू शकता. ज्याची रेसिपी एकदम सोपी आहे. पावटा भात करण्याची सोपी, साधी रेसिपी पाहूया. थंडीच्या दिवसांत तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर जिभेलाही चव येईल. (Satara Special Recipe Pavta Bhat)
पावटा भात करण्याची सोपी पद्धत
हा पदार्थ केवळ चविष्ट नसून पौष्टिकही आहे. पावटा भात करवण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ धवून बाजूला ठेवा. नंतर एका मोठ्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता, हिंग, हळदीची फोडणी तयार करा. या फोडणीत बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या परतवून घ्या. कांदा गुलाबी झाला की त्यात ताजे सोललेले पावट्याचे दाणे, चिरलेला बटाटा आणि आवडीनुसार फ्लॉवरचे तुकडे घालून वाफेवर थोडं शिजवून घ्या. फोडणीचा सुगंध सुटला की त्यात कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला मिसळून घ्या. मसाल्याचा कच्चेपणा गेल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालून व्यवस्थित परतवून घ्या.
जेणेकरून मसाला प्रत्येक तांदळाच्या कणाला लागेल. आता यात तांदळाच्या दुप्पट गरम पाणी, चवीनुसार मीठ घाला. वरून ओलं खोबरं आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्या किंवा पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजवून घ्या.
भात शिजत असताना येणारा पावट्याचा आणि मसाल्याचा सुवास संपूर्ण घरात दरवळतो. तयार मऊ पावटा भातासोबत तुम्ही लिंबाची फोड आणि ओल्या खोबर्याची चटणी किंव ताक सर्व्ह करू शकता. हिवाळ्यातील रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम वन पॉट मील आहे.
