Lokmat Sakhi >Food > मालपुआ अनेकदा खाल्ला असेल, आता दूधपुआ ट्राय करा; गौराईच्या नैवेद्यासाठी 'हटके' रेसेपी 

मालपुआ अनेकदा खाल्ला असेल, आता दूधपुआ ट्राय करा; गौराईच्या नैवेद्यासाठी 'हटके' रेसेपी 

Gauri Pujan Recipe 2025 : गौराईच्या नैवेद्याला घावन घाटले हा पारंपरिक पदार्थ करतात, त्याचेच हे हटके व्हर्जन ट्राय करून बघा, ज्याचे नाव आहे दूधपुआ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:47 IST2025-08-29T15:46:08+5:302025-08-29T15:47:57+5:30

Gauri Pujan Recipe 2025 : गौराईच्या नैवेद्याला घावन घाटले हा पारंपरिक पदार्थ करतात, त्याचेच हे हटके व्हर्जन ट्राय करून बघा, ज्याचे नाव आहे दूधपुआ!

Gauri Pujan Recipe 2025 : You must have eaten Malpua many times, now try Dudhpua; 'different' recipe for offering to Gaurai | मालपुआ अनेकदा खाल्ला असेल, आता दूधपुआ ट्राय करा; गौराईच्या नैवेद्यासाठी 'हटके' रेसेपी 

मालपुआ अनेकदा खाल्ला असेल, आता दूधपुआ ट्राय करा; गौराईच्या नैवेद्यासाठी 'हटके' रेसेपी 

प्रांतवार सण-उत्सव बदलतात, भाषा बदलते तसेच पदार्थही बदलतात. कधी कधी तर अनेक गोष्टीत साधर्म्य दिसून येते, फक्त बोलीभाषेनुसार नावं बदलतात आणि राहण्या, खाण्याच्या पद्धतीही! येत्या रविवारी अर्थात ३१ ऑगस्ट रोजी गौरी आगमन(Gauri Aagman 2025) आहे आणि १ सप्टेंबर रोजी गौरी पूजन(Gauri Pujan 2025) जेवण आहे. गौराईसाठी महाराष्ट्रात घावन घाटल्यांचा पारंपरिक नैवेद्य असतो, त्यालाच बिहारमध्ये दूध पुआ म्हणतात. यात रेसेपीमधे आहे सिम्पल ट्विस्ट, पण त्यामुळेच पदार्थाचे स्वरूपच बदलणार आहे, कसे ते पाहू. 

दुधपुआ रेसेपी : 

साहित्य : एक लिटर दूध, १०० ग्राम साखर, सुका मेवा, वेलदोड्याची पूड, एक वाटी तांदळाचे पीठ, पाणी. 

कृती : 

एक कप तांदळाच्या पिठात थोडे थोडे पाणी घाला आणि सरबरीत बॅटर तयार करा आणि पंधरा मिनिटं बाजूला ठेवा. 

१ लिटर फुल फॅट दूध घेऊन ते अर्ध्यावर येईपर्यंत आटवून घ्या. 

दुधाला उकळी फुटली की १०० ग्रॅम साखर, बारीक चिरलेला सुकामेवा, वेलदोडा पूड घालून एकजीव करून घ्या. 

आटवलेले दूध बाजूला ठेवून एका गॅसवर फ्रायपॅन ठेवा, तो चांगला गरम करून घ्या. 

त्यात तांदळाच्या पिठाचे छोटेसे पुए अर्थात छोटेसे घावन करून घ्या. 

झाकण ठेवून १ मिनिटं शेकून घ्या, दुसरी बाजू २० सेकंद शेकून घ्या. 

सर्व्ह करताना हे तांदळाचे घावन दुधात घालून दूधपुआ सुक्यामेव्याने सजवा. 

नारळाचे दूध काढण्याचा ज्यांना कंटाळा येतो, त्यांनी घावन घाटल्यांना पर्याय म्हणून ही रेसेपी ट्राय करायला हरकत नाही, तेवढाच चवबदल! पहा व्हिडीओ... 


Web Title: Gauri Pujan Recipe 2025 : You must have eaten Malpua many times, now try Dudhpua; 'different' recipe for offering to Gaurai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.