हिवाळा हा ऋतू खवय्यांसाठी खूप खास असतो. कारण या दिवसांत बाजारात वेगवेगळ्या भाज्या आलेल्या असतात आणि त्या रंगबेरंगी भाज्यांपासून कित्येक वेगवेगळे पदार्थ करता येतात. हिवाळ्यात लोणचे या पदार्थाचीही खूप चंगळ असते. ओल्या हळदीचं लोणचं त्याचबरोबर गाजर, मुळा, मटार, कारले असे कित्येक लोणचे या दिवसांत हौशीने केले जातात. आता त्याच बरोबरीने एकदा लसूण लोणचंही करून पाहा. लसूण लोणच्याची ही रेसिपी अतिशय सोपी असून या रेसिपीने केलेलं लोणचं अतिशय पौष्टिक असतं. जेवणाची चव खुलविण्यासाठी हे लसूण लोणचं नक्कीच खूप उपयोगी ठरतं.
लसूण लोणचं करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या
१ टेबलस्पून तिखट
अर्धा टीस्पून हळद
आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..
१ टेबलस्पून धनेपूड
१ टीस्पून आमचूर पावडर किंवा एक ते दिड लिंबाचा रस
फोडणीसाठी तेल, मोहरी, मेथ्या, सुकलेल्या लाल मिरच्या आणि हिंग
चवीनुसार मीठ
कृती
लसूण लोणचं करण्यासाठी सगळ्यात आधी लसूण पाकळ्या इडली पात्रात किंवा ढोकळा पात्रात ठेवा आणि ६ ते ८ मिनिटे वाफवून घ्या.
वाफवलेल्या लसूण पाकळ्या एका भांड्यामध्ये काढा. त्यात तिखट, हळद, धने पूड, मीठ आणि लिंबाचा रस घाला आणि हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर ते १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
८ जबरदस्त फायदे देणारा १ सोपा व्यायाम, करिना कपूरही रोज करते- चाळिशीनंतरही फिट राहायचं तर...
आता तोपर्यंत एका छोट्या कढईमध्ये फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर ती लसूणावर घाला. सगळं व्यवस्थित हलवून घेतलं की चटपटीत लसूण लोणचं झालं तयार. या रेसिपीमध्ये तुम्ही विकत मिळणारा लोणचं मसालाही घालू शकता.
