Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कुरमुऱ्यांचा लसूणी चिवडा, मुलांच्या परीक्षेच्या काळातला आवडता खाऊ-चिवडा खात अभ्यास सुसाट

कुरमुऱ्यांचा लसूणी चिवडा, मुलांच्या परीक्षेच्या काळातला आवडता खाऊ-चिवडा खात अभ्यास सुसाट

Garlic chivda recipe, summer recipe - you will love it , easy to make and very tasty : कुरमुऱ्यांचा लसूण घातलेला चिवडा करा घरीच, चविष्ट आणि सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 15:09 IST2026-03-24T15:07:39+5:302026-03-24T15:09:46+5:30

Garlic chivda recipe, summer recipe - you will love it , easy to make and very tasty : कुरमुऱ्यांचा लसूण घातलेला चिवडा करा घरीच, चविष्ट आणि सोपी रेसिपी.

Garlic chivda recipe, summer recipe - you will love it , easy to make and very tasty | कुरमुऱ्यांचा लसूणी चिवडा, मुलांच्या परीक्षेच्या काळातला आवडता खाऊ-चिवडा खात अभ्यास सुसाट

कुरमुऱ्यांचा लसूणी चिवडा, मुलांच्या परीक्षेच्या काळातला आवडता खाऊ-चिवडा खात अभ्यास सुसाट

कुरमुऱ्यांचा चिवडा हलका आणि चविष्ट असतो. त्यात अनेक प्रकार आहेत .त्यातलाच एक सोपा प्रकार म्हणजे लसणाचा चिवडा. करायला अगदी सोपा आणि चवीला भारी. हा चिवडा खास करून संध्याकाळच्या वेळी चहाबरोबर खायला छान लागतो. हलका असल्यामुळे पोटावर ताण न देता भूक भागवतो. (Garlic chivda recipe, summer recipe - you will love it , easy to make and very tasty )प्रवासात किंवा डब्यातही हा सहज नेता येतो, कारण तो टिकाऊ असतो आणि पटकन खराब होत नाही. लसूण घातल्यामुळे या चिवड्याला केवळ चवच नाही तर काही प्रमाणात आरोग्यदायी गुणधर्मही मिळतात. लसूण पचनासाठी उपयोगी मानला जातो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे हा चिवडा चविष्ट असतानाच थोडा फार पौष्टिकही ठरतो. पाहा कसा करायचा. 

साहित्य 
लसूण, लाल तिखट, बारीक शेव, मीठ, तेल, कुरमुरे 

कृती
१. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या, भरपूर लसूण घ्यायचा. लसूण मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट तयार करायची. जरा जास्त वाटा. पाणी वापरु नका. चिवडा मऊ पडेल. कुरमुरे भाजून घ्यायचे. मस्त कुरकुरीत करायचे. मग जरा गार करत ठेवायचे 

२. एका कढईत तेल घ्यायचे. तेल गरम करायचे. तीन पळ्या तरी तेल हवे. तेलात तयार केलेली लसणाची पेस्ट घालायची आणि मस्त परतायची. परतून जरा रंग बदलायला लागला की गॅस बंद करायचा. तेल जरा गार झालं की त्यात लाल तिखट घालायचे, मीठ घालायचे. ढवळायचे म्हणजे ते जळणार नाही. 

३. एका परातीत कुरमुरे घ्यायचे त्यात शेव घालायची आणि तयार केलेली फोडणी ओतायची. चमच्याने ढवळून घ्यायचे जरा कोमट झाले की हाताने कालवायचे. मसाला सगळीकडे व्यवस्थित लागेल याची काळजी घ्यायची. मस्त खमंग आणि कुरकुरीत चिवडा तयार होतो. चिवडा पूर्णपणे गार झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवायचा. 

Web Title : लहसुन मुरमुरा नमकीन: आसान, स्वादिष्ट, परीक्षा के लिए उत्तम नाश्ता।

Web Summary : यह लहसुन के स्वाद वाला मुरमुरा नमकीन बनाने में आसान और स्वादिष्ट है। यह चाय के साथ एकदम सही है, पेट के लिए हल्का है और यात्रा के लिए अच्छा है। लहसुन स्वाद और संभावित स्वास्थ्य लाभ जोड़ता है, पाचन में सहायता करता है और प्रतिरक्षा को बढ़ाता है। नुस्खा का पालन करके इस सरल, स्वादिष्ट और कुछ हद तक पौष्टिक नाश्ते का आनंद लें।

Web Title : Garlic Puffed Rice Snack: Easy, tasty, and perfect study fuel.

Web Summary : This garlic-flavored puffed rice snack is easy to make and delicious. It's perfect with tea, light on the stomach, and travels well. Garlic adds flavor and potential health benefits, aiding digestion and boosting immunity. Enjoy this simple, tasty, and somewhat nutritious treat by following the recipe.