Lokmat Sakhi >Food > मोदक फाटतात-कडक होतात? उकड काढताना 3 गोष्टी करा, सुबक-मऊसूत, कळीदार होतील

मोदक फाटतात-कडक होतात? उकड काढताना 3 गोष्टी करा, सुबक-मऊसूत, कळीदार होतील

Ganesh Utsav 2025 : उकड काढताना पाण्याचा अंदाज खूप महत्त्वाचा असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:44 IST2025-08-18T19:41:00+5:302025-08-18T19:44:01+5:30

Ganesh Utsav 2025 : उकड काढताना पाण्याचा अंदाज खूप महत्त्वाचा असतो.

Ganesh Utsav 2025 : How To Make Ukdicha Modak Perfect | मोदक फाटतात-कडक होतात? उकड काढताना 3 गोष्टी करा, सुबक-मऊसूत, कळीदार होतील

मोदक फाटतात-कडक होतात? उकड काढताना 3 गोष्टी करा, सुबक-मऊसूत, कळीदार होतील

गणपती (Ganesh Utsav 2025) बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक. मोदक बनवणं ही एक कला आहे आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग आहे. अनेक घरांमध्ये गणपतीच्या आगमनासोबतच मोदकांचा सुगंध दरवळू लागतो. पण मोदक बनवणं जितकं आनंददायी आहे, तितकंच ते आव्हानात्मकही आहे, खासकरून नवख्यांसाठी. कधी कधी उकड व्यवस्थित न झाल्यास मोदक वाफवताना फाटतात, सारण बाहेर येतं किंवा कळ्या नीट येत नाहीत. मग आपला हिरमोड होतो. पण काळजी करू नका! यावर काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास मोदक एकदम परफेक्ट बनतील आणि मोदक बनवण्याचा तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. (How To Make Ukdicha Modak Perfect)

उकड काढण्याची सोपी पद्धत

उकड काढताना पाण्याचा अंदाज खूप महत्त्वाचा असतो. एका भांड्यात पिठाच्या अंदाजानुसार पाणी घ्या, त्यात एक चमचा तेल किंवा तूप आणि चवीनुसार मीठ घाला. पाणी उकळायला लागल्यावर लगेच एक कप तांदळाचे पीठ घाला. गॅस लगेच बंद करा आणि पीठ चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या.

पाण्यामध्ये पीठ चांगलं मिसळलं की त्यावर झाकण ठेवा आणि ते मिश्रण साधारण ५ ते ७ मिनिटं वाफेवर शिजू द्या. यामुळे पीठ चांगलं फुलतं आणि मऊ होतं. त्यानंतर हे पीठ एका परातीत काढा आणि पीठ गरम असतानाच हाताला थोडं तेल किंवा तूप लावून चांगलं मळून घ्या. पीठ जितकं जास्त मळाल, तितकी त्याची उकड चांगली होते आणि मोदक फाटत नाहीत.

डेली वेअरसाठी १८ कॅरेट मंगळसुत्रांचे सुंदर डिझाइन्स-बजेट कमी पण दागिना मात्र अस्सल

कळ्या पाडण्याच्या खास ट्रिक्स

पातळ पारी: मोदकाची पारी शक्यतो पातळ ठेवा. जाड पारी असल्यास मोदक वाफवताना आतून नीट शिजत नाही आणि कळ्या पण चांगल्या दिसत नाहीत.

 कळ्या पाडताना काळजी: अंगठ्याच्या मदतीने पारीला कळीचा आकार द्या. सुरुवातीला ६ ते ७ कळ्या पाडा आणि नंतर हळूहळू कळ्यांची संख्या वाढवू शकता. कळ्या पाडताना अंगठ्याचा वापर केल्यास त्या अधिक टोकदार आणि आकर्षक दिसतात.

रोपं वाढतात भरपूर पण फुलंच येत नाही? कांद्याची साल ‘अशी’ कुंडीत घाला-फुलांनी डवरतील झाडं

साच्याचा वापर: सुरुवातीला मोदक हाताने बनवताना कळ्या पाडणं अवघड वाटल्यास तुम्ही साच्याचा वापर करू शकता. पण साच्याचा वापर करण्याआधी साच्याला आतून थोडं तूप लावा, ज्यामुळे मोदक साच्याला चिकटणार नाही. याा टिप्स वापरून मोदक बनवल्यास तुमचे मोदक नक्कीच फाटणार नाहीत आणि सुबक बनतील.

Web Title: Ganesh Utsav 2025 : How To Make Ukdicha Modak Perfect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.