Lokmat Sakhi >Food > Ganesh Utsav 2025: साखर- गूळ न घालता मोदक करण्याची खास रेसिपी- अतिशय चविष्ट, पौष्टिक

Ganesh Utsav 2025: साखर- गूळ न घालता मोदक करण्याची खास रेसिपी- अतिशय चविष्ट, पौष्टिक

How To Make Modak Without Adding Jaggery and Sugar: गणेशोत्सवात गणपतीच्या नैवेद्यासाठी साखर, गूळ न घालताही खूप चवदार मोदक तयार करता येतात. बघा कसे करायचे..(sugar free healthy modak recipe for ganpati festival 2025)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 11:54 IST2025-08-23T11:52:48+5:302025-08-23T11:54:25+5:30

How To Make Modak Without Adding Jaggery and Sugar: गणेशोत्सवात गणपतीच्या नैवेद्यासाठी साखर, गूळ न घालताही खूप चवदार मोदक तयार करता येतात. बघा कसे करायचे..(sugar free healthy modak recipe for ganpati festival 2025)

Ganesh Utsav 2025, how to make modak without adding jaggery and sugar, sugar free healthy modak recipe for ganpati festival 2025 | Ganesh Utsav 2025: साखर- गूळ न घालता मोदक करण्याची खास रेसिपी- अतिशय चविष्ट, पौष्टिक

Ganesh Utsav 2025: साखर- गूळ न घालता मोदक करण्याची खास रेसिपी- अतिशय चविष्ट, पौष्टिक

Highlightsवेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी किंवा मधुमेह असणाऱ्यांसाठीही हे मोदक पौष्टिक ठरतील..

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे (Ganesh Utsav 2025). त्यामुळे घरोघरी त्याची अगदी जय्यत तयारी सुरू आहे. सजावट, आरास, रांगोळ्या या गोष्टी तर हाेतातच. पण त्यासोबतच गणरायाला नैवेद्यासाठी रोज कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायचे, असा प्रश्नही पडतोच. म्हणूनच त्याच प्रश्नाचं हे घ्या अगदी खास उत्तर.. आपण जी मोदकांची रेसिपी बघणार आहोत, त्या रेसिपीमध्ये गूळ, साखर असं काहीही घालणार नाही (how to make modak without adding jaggery and sugar?). त्यामुळे वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी किंवा मधुमेह असणाऱ्यांसाठीही हे मोदक पौष्टिक ठरतील आणि त्यांना त्याचा मनाप्रमाणे आस्वाद घेता येईल.(sugar free healthy modak recipe for ganpati festival 2025)

साखर, गूळ न घालता मोदक कसे करायचे?

 

साहित्य

बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे सगळं साहित्य मिळून एक वाटी

अर्धी वाटी खजूर

पाव वाटी किसलेलं खोबरं

सोन्याच्या दागिन्यांची झळाळी गेली? ३ सोपे उपाय- सणासुदीला तुमच्या अंगावर दिसतील उजळलेले सुंदर दागिने

पाव वाटी सुके अंजीर

१ टीस्पून वेलची पूड

२ ते ३ टेबलस्पून तूप

कृती 

ही रेसिपी करण्यासाठी तर सगळ्यात आधी खोबरं किसून घ्या.

 

यानंतर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता या सगळ्या पदार्थांचे अगदी बारीक काप करून घ्या. किंवा बारीक काप करणं शक्य नसेल तर हे पदार्थ मिक्सरमध्ये थोडे जाडेभरडे फिरवून घ्या. पण त्यांचा खूप बारीक कूट करू नका.

काही सेकंदातच दारासमोर काढा सुंदर रांगोळी- रेडिमेड रांगोळी पॅचेस आणा- मनपसंत रांगोळी तयार...

अंजीर अगदी बारीक चिरून घ्या आणि खजुरामधल्या बिया काढून ते थोडे हातानेच मॅश करून घ्या.

आता एका मोठ्या भांड्यामध्ये सुकामेव्याचे काप, बारीक चिरलेले अंजीर, खजूर, वेलची पूड असं सगळं एकत्र करा आणि त्यामध्ये थोडं कोमट केलेलं तूप घाला. आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करा आणि नंतर त्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे मोदक करा. मोदक करायचे नसतील तर त्याचे लाडूही करू शकता. 
 

Web Title: Ganesh Utsav 2025, how to make modak without adding jaggery and sugar, sugar free healthy modak recipe for ganpati festival 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.