चपाती हा आपल्या रोजच्या खाण्यातील पदार्थ आहे पण आजकाल प्रत्येकाचंच जीवन धावपळीचं झालं आहे. लोक चपात्या करण्यासाठी घाई होऊ नये म्हणून आधीच पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमधलं पीठ कितीवेळ चांगलं राहतं याची बऱ्याचजणांना कल्पना नसते. फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ कितीवेळ चांगलं राहू शकतं समजून घेऊ. (Fresh Vs Stale Roti Nutrition Do You Make Roti With Leftover Dough0
फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाची चपाती खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? (Why You Should Not Keep Chapati Dough In Fridge)
शिळ्या पिठाची चपाती खाणं ऐकण्यासाठी ओके वाटू शकतं पण यामुळे तुम्हाला बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. पोटात गॅस तयार होऊ शकतो कारण ही चपाती पचायला जड असते ज्यामुळे पोट फुगणं, गॅस तयार होणं, शरीर जड वाटणं अशा समस्या उद्भवू शकतात. ताजं पीठ फायबर आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. तर शिळ्या पिठात पोषक तत्व नष्ट झालेली असतात.
जर मळून ठेवलेलं पीठ जास्त जुनं असेल तर फूड पॉईजनिंगचाही धोका असतो. आयुर्वेदात स्पष्ट सांगण्यात आलं आहे की नेहमी ताजं आणि गरम अन्नच खावं. मळलेल्या पिठात तामसिक गुण असतात. तर वैज्ञानिकदृष्या पाहिल्यास मळून ठेवलेल्या पिठात कार्ब्स जास्त तयार होतात. ज्यामुळे पोषक कमी होतं
फ्रिजमध्ये पीठ ठेवत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या
फ्रिजमध्ये पीठ ठेवताना नेहमी झाकणाच्या डब्याचा वापर करा. जेणेकरून बाहेरील हवा आणि बॅक्टेरियाजशी संपर्क येणार नाही. कणकेला वरून तेल किंवा तूप लावून मग डब्यात भरा. पीठ मळल्यानंतर ८ ते १० तासांपेक्षा जास्तवेळ फ्रिजमध्ये ठेवू नका.
मळून ठेवलेल्या पिठात बॅक्टेरियाज कधी तयार होतात?
एक्सपर्ट्सच्या मते जेव्हा तुम्ही पिठात पाणी घालता तेव्हा त्यात रासायनिक बदल होण्यास सुरूवात होते. पीठ मळून जेव्हा तुम्ही किचन स्लॅब किंवा फ्रिजमध्ये तासनतास तसंच ठेवता तेव्हा फर्मेंटेशनची प्रक्रीया सुरू होते. साध्या शब्दांत सांगायचं झालं तर हवेतील बॅक्टेरिया आणि फंगस पिठात घर तयार करतात. तुम्ही जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी बॅक्टेरियांजी वाढ पूर्णपणे रोकता येत नाही. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाचा रंग हलका काळापट होतो. त्यालाचा वेगळाचं दुर्गंध येतो. अनेकदा पीठ चांगलं असतं पण त्यातील पोषण मुल्य कमी झालेली असतात.
Web Summary : Avoid prolonged refrigeration of chapati dough. It can cause gas, reduce nutrients, and potentially lead to food poisoning. Use airtight containers, apply oil, and limit storage to 8-10 hours for safety and freshness.
Web Summary : चपाती के आटे को लंबे समय तक फ्रिज में रखने से बचें। इससे गैस हो सकती है, पोषक तत्व कम हो सकते हैं और फूड पॉइजनिंग का खतरा हो सकता है। सुरक्षा और ताजगी के लिए एयरटाइट कंटेनर का उपयोग करें, तेल लगाएं और भंडारण को 8-10 घंटे तक सीमित करें।