Join us  

सुर्र के पीओ, सुपर टेस्टी मिक्स व्हेज सूप! भाज्यांना नाक मुरडणारेही म्हणतील, दिल मांगे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 4:58 PM

Healthy treat: कधी कधी भाज्या खाण्याचा कंटाळा येतो ना? अशा वेळी करा मिक्स व्हेज सूप (mix veg soup).... थंडीमध्ये स्वत:ला आणि घरातल्या सगळ्यांना द्या मस्त गरमागरम हेल्दी ट्रीट... सुर्र के पीओ...

ठळक मुद्देरात्रीच्या जेवणात करा मस्त चवदार आणि गरमागरम (hot and delitious) मिक्स व्हेज सूप.

लहान मुलांनाच कशाला, अगदी मोठ्या माणसांनाही कधीकधी त्याच त्या भाज्या खाण्याचा कंटाळा येतो. चवीत काहीतरी बदल हवा, असं वाटतं.. असं वाटलं ना, तर रात्रीच्या जेवणात करा मस्त चवदार आणि गरमागरम (hot and delitious) मिक्स व्हेज सूप... विशेष म्हणजे हे सूप करणं खूपच सोपं आहे. फक्त त्यासाठी तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या भाज्या असल्या पाहिजेत. रात्री कधीतरी आपली अगदी थोडंसंच खाण्याची इच्छा असते. अशा वेळी मिक्स व्हेज सूप एक मोठं बाऊल भरून घेतलं, तरी आपलं काम फत्ते होतं.. भूकही भागते आणि पोटात काहीतरी चवदार, गरमागरम आणि पौष्टिकही जातं. शिवाय खिचडी, भात अशा पदार्थांसाेबतही हे सूप मस्त लागतं. 

 

मिक्स व्हेज सूप करण्यासाठी लागणारं साहित्यबटर किंवा तेल, अद्रक, लसूण, कांद्याची पात. कोबी, वाटाणे, सिमला मिरची, गाजर, बीन्स, स्वीटकॉर्न या सगळ्या भाज्या सारख्या प्रमाणात. चिलीफ्लेक्स, मिक्स हर्ब्स, मिरेपूड, मीठ, व्हिनेगर, कॉर्नफ्लॉवर, पाणी. 

टोमॅटो महाग झाले, पावभाजीचा बेत रद्द करताय? ही घ्या बिन टोमॅटोची चविष्ट पावभाजी

कसं करायचं मिक्स व्हेज सूप?How to make mix veg soup- मिक्स व्हेज सूप करण्यासाठी सगळ्यात आधी कढईत थोडं तेल किंवा बटर टाका.- बटर तापल्यानंतर त्यात लसूणाचे बारीक कापलेले तुकडे, किसलेले अद्रक आणि चिरलेली कांद्याची पात टाका.- हे सगळे थोडे परतून घ्या.- त्यानंतर त्यात सिमला मिरची, बीन्स, गाजर यांचे बारीक बारीक चौकोनी आकारात चिरलेले काप टाका आणि सगळ्या भाज्या थोड्या परतून घ्या.

 

- त्यानंतर त्यात स्वीटकॉर्न, पत्ताकोबी टाका आणि व्यवस्थित परतून घ्या.- आता त्यात चार कप पाणी टाका. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि एक टी स्पून व्हिनेगर टाका.- आता एका वाटीत एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्या. त्यात एक टेबलस्पून पाणी टाका आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट सूपमध्ये टाका. यामुळे सूपचा घट्टपणा वाढेल.- त्यानंतर त्यात चवीनुसार चीलीफ्लेक्स, मिक्स हर्ब्स, मिरेपूड हे साहित्य टाका.- सूपला एक उकळी आली की झाकण ठेवून ते एखाद्या मिनिटासाठी सेट होऊ द्या आणि त्यानंतर गरमागरम सूप पिण्याचा आस्वाद घ्या.. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाज्या