Lokmat Sakhi >Food > Ashad Special Food: आषाढ तळला का? आषाढात पदार्थ तळण्याची प्रथा काय असते, पाहा आषाढ स्पेशल पुऱ्यांची रेसिपी

Ashad Special Food: आषाढ तळला का? आषाढात पदार्थ तळण्याची प्रथा काय असते, पाहा आषाढ स्पेशल पुऱ्यांची रेसिपी

Ashadha Talan Food Recipes:: बाहेर पाऊस, घरात आपण आणि हातात भजी, चहा नाही हे शक्य आहे का? यासाठी ऑफिशिअल पिरेड म्हणजे आषाढ तळण; वाचा माहिती आणि रेसेपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:00 IST2025-06-24T12:59:14+5:302025-06-24T13:00:04+5:30

Ashadha Talan Food Recipes:: बाहेर पाऊस, घरात आपण आणि हातात भजी, चहा नाही हे शक्य आहे का? यासाठी ऑफिशिअल पिरेड म्हणजे आषाढ तळण; वाचा माहिती आणि रेसेपी!

Food: Ashadh Talan starts from June 26; Know this custom and the recipe for spicy puris! | Ashad Special Food: आषाढ तळला का? आषाढात पदार्थ तळण्याची प्रथा काय असते, पाहा आषाढ स्पेशल पुऱ्यांची रेसिपी

Ashad Special Food: आषाढ तळला का? आषाढात पदार्थ तळण्याची प्रथा काय असते, पाहा आषाढ स्पेशल पुऱ्यांची रेसिपी

Ashad Talan: हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस 'साजरा' करण्यासाठी काही ना काही निमित्त शोधले जाते, नव्हे तर ते मिळते! जसे की आषाढ तळण! यालाच आखाड तळणे असेही म्‍हणतात. २६ जून २०२५ रोजी आषाढ मास सुरु होत आहे. इथून पुढे महिनाभर तळलेले पदार्थ खाण्याची निसर्गाने ऑफिशिअल परवानगी दिली असते असे समजा. अर्थात तेही प्रमाणात, हे वेगळे सांगायला नको. 

ऋतूनुसार आहार घेणे शरीरासाठी कधीही लाभदायीच ठरते. आषाढात पाऊस मुरलेला असतो. वातावरणात आर्द्रता वाढते. तशी पोटात भूकही वाढते. तळलेले पदार्थ या काळात खाल्ले की पोट लवकर भरते आणि जठराग्नी शांत होतो. शिवाय जिभेचे चोचलेही पुरवले जातात. यादृष्टीने आषाढ तळण केले जाते. 

तसेच सासरी गेलेली नववधू या काळात माहेरी बोलावली जाते. तिचे लाड कौतुक करण्यासाठी देखील आषाढ तळण केले जाते. या काळात पुढील पदार्थ केले जातात - 

पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, भजी, कडबोळी, अळू वडी, कोथिंबीर वडी, पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जात असत. त्याला खीर, लाडू, शिरा इ. गोड धोड पदार्थांची जोड असे. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आले पाकची वडी याचाही समावेश केला जातो. आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भर पडते आणि आखाड तळला जातो. 

या आषाढ तळण निमित्त पारंपरिक पदार्थ, तिखट मिठाच्या चटपटीत पुऱ्या : 

साहित्य : जिरे, बडीशेप, धने, ओवा प्रत्येकी १ चमचा, ६ लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या, २ वाट्या गव्हाचे पीठ, अर्धा वाटी बेसन, कोथिंबीर, हळद, तिखट प्रत्येकी एक चमचा, मीठ, पांढरे तीळ, तळणीसाठी तेल 

कृती : 

>> सर्वप्रथम जिरे, बडीशेप, धने, ओवा, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या दोन चमचे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. 

>> एका परातीत २ वाट्या गव्हाचे पीठ, अर्धा वाटी बेसन, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट पावडर, तीळ आणि मिक्सरमध्ये केलेले वाटण घालून घ्या. 

>> त्यात दोन मोठ्या चमच्याचे गरम मोहन घाला. 

>> गरजेनुसार पाणी घालून पुऱ्यांसाठी लागते तशी मऊ, घट्टसर कणिक भिजवून घ्या. 

>> एक मोठी पोळी लाटून वाटीच्या साहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्या. 

>> तेल गरम झाले की मध्यम आचेवर पुऱ्या छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या. 

>> या पुऱ्या रूम टेम्परेचरला आठ दिवस मस्त टिकतात. 


Web Title: Food: Ashadh Talan starts from June 26; Know this custom and the recipe for spicy puris!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.