Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकदम मऊसूत आणि फुगलेली चपाती खायला हवीय? पीठ मळताना 'या' ४ स्टेप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:17 IST

काही सोप्या स्टेप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या चपात्या मऊ होतील आणि जेवणाचा आनंदही द्विगुणित होईल.

गरम, मऊसूत आणि फुगलेल्या चपात्या खायला सर्वांनाच आवडतात. चपाती कडक असेल तर ती चावण्यासाठी त्रास होऊ शकतो. विशेषत: जेव्हा पीठ व्यवस्थित मळलेलं नसतं तेव्हा असं घडतं. अशा वेळी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या चपात्या मऊ होतील आणि जेवणाचा आनंदही द्विगुणित होईल.

पीठ कसं मळायचं?

- जर तुम्हाला मऊ चपाती बनवायची असेल तर ते पीठ कोमट पाण्याने चांगलं मळून घ्या. 

- पीठ मळताना मीठ घातल्यास चपाती मऊ तर होईल, शिवाय चविष्टही लागेल.

- पीठ मळल्यानंतर लगेच चपात्या लाटू नका. ते पीठ थोडा वेळ तसेच ठेवा. प्लेट किंवा कपड्याने झाकून ठेवा. यानंतर चपाती बनवा. यामुळे ती मऊ होईल आणि खातानाही मजा येईल. 

- तवा आधी चांगला गरम करून घ्या आणि नंतर चपाती तव्यावर ठेवा. यामुळे चपाती चांगली शेकली जाते. त्यानंतर चपात्या नेहमी नीट झाकून ठेवा.

शिळी चपाती खाण्याचे फायदे 

- शिळी चपाती खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते, पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका होते.

-  शिळ्या चपातीचा जीआय (GI- glycemic index) खूप कमी असतो.

- ज्यांना आतड्यांशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. 

-  तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील हे चांगलं आहे.

- शिळी चपाती कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सकिचन टिप्स