Join us

कतरिना कैफचं फिटनेस सिक्रेट! फिट राहण्यासाठी पिते खास स्मुदी, बघा तिने सांगितलेली स्पेशल रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 16:38 IST

Katrina Kaif's Fitness Secret: स्वत:चा फिटनेस मेंटेन करण्यासाठी कतरिना नेमकं काय करते, याचं सिक्रेट तिने नुकतंच सांगितलं आहे. तिच्यासारखी स्लिमट्रिम फिगर आणि सुंदर त्वचा पाहिजे, तर तिचीच ही खास रेसिपी  करून बघा..(recipe shared by Katrina)

ठळक मुद्देही स्मूदी ती नियमित घेत असून हेच तिच्या फिटनेसचं सिक्रेट आहे, असं ती सांगते.

बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याबाबत, त्यांच्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असतात. सौंदर्य टिकवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी जे काही व्यायाम, आहार गरजेचे आहेत, ते सगळे जसेच्या तसे फॉलो करण्याकडे त्यांचा कल असतो. शिवाय सौंदर्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी कोणताही उपाय थोडे दिवस केला आणि नंतर सोडून दिला असं त्यांच्या बाबतीत मुळीच होत नाही. त्या बाबतीत त्या कमालीच्या काटेकोर आणि नियमित असतात. कतरिना कैफही (Katrina Kaif) त्याला अपवाद नाही. सौंदर्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी मेंटेन करण्यासाठी ती जी खास गोष्ट नियमितपणे घेते, त्याची स्पेशल रेसिपी तिने नुकतीच शेअर केली आहे. (avocado smoothie, recipe shared by Katrina)

 

आणि तो जो काही खास पदार्थ आहे तो म्हणजे ॲव्हाकॅडो- बनाना स्मूदी. lets_eat_with_prachi या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिनाने या स्मूदीची रेसिपी प्रात्यक्षिकासह करून दाखवली आहे. ही स्मूदी ती नियमित घेत असून हेच तिच्या फिटनेसचं सिक्रेट आहे, असं ती सांगते. ती म्हणते की ही स्मूदी कशी दिसते, त्यावर जाऊ नका. कारण चव आणि पौष्टिक गुण या दोन्ही बाबतीत ही स्मूदी जबरदस्त आहे. कतरिनासारखी ॲव्हाकॅडो- बनाना स्मूदी करायची असेल तर ही घ्या तिनेच सांगितलेली खास रेसिपी.

 

ॲव्हाकॅडो- बनाना स्मूदीसाहित्य - अर्धे ॲव्हाकॅडो, १ केळ, ३ ते ४ पालकाची पाने, ५ ते ६ पुदिन्याची पाने, १ टी स्पून खोबऱ्याचं तेल, १ टीस्पून सब्जा, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा कप पाणी, १- २ बर्फाचे तुकडे, १ टीस्पून कोको पावडर. - स्मूदी जर गोड हवी असेल तर त्यात १ टीस्पून मध घालावा.कृती- हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाका आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. कतरिना कैफ स्पेशल ॲव्हाकॅडो- बनाना स्मूदी तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कतरिना कैफ