Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजीत भाजी मेथीची पण काही माणसांसाठी ती ठरते जीवघेणी-इतकी बिघडते तब्येत की रवानगी थेट दवाखान्यात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:44 IST

प्रत्येक हेल्दी गोष्ट सगळ्यांसाठी फायदेशीर असेलच असं नाही. काही परिस्थितींमध्ये मेथी नुकसानदायक ठरू शकते.

हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचा विषय निघाला आणि मेथीच्या पानांचा उल्लेख झाला नाही, असं क्वचितच होतं. हिरवी मेथी चवीला थोडी कडू असली तरी पोषक तत्वांच्या बाबतीत ती एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही. यात आयर्न, फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आहारात मेथीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रत्येक हेल्दी गोष्ट सगळ्यांसाठी फायदेशीर असेलच असं नाही. काही परिस्थितींमध्ये मेथी नुकसानदायक ठरू शकते.

मेथी खाल्ल्याने वजन कमी होतं का?

मेथीच्या दाण्यांचा वापर वजन कमी करण्यासाठी आणि वाढलेलं पोट आत घेण्यासाठी प्रभावी मानला जातो. तसंच, मेथीच्या ताज्या पानांचं पाणी प्यायल्यानेही वजन घटवण्यास मदत होऊ शकते.

मेथीची पाने कोणांनी खाऊ नयेत?

ज्यांना मेथीची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी मेथीची पाने खाऊ नयेत. तसेच ज्यांची पचनशक्ती खूप कमजोर आहे किंवा ज्यांना वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटी, जुलाबाचा त्रास होतो, त्यांनी मेथी कमी प्रमाणातच घ्यावी. गर्भवती महिलांनीही जास्त प्रमाणात मेथीची पाने खाणे टाळावे, कारण यामुळे शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात.

कोणत्या आजारात मेथी टाळावी?

लो ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी मेथीचे सेवन जपून करावे, कारण ती ब्लड प्रेशर आणखी कमी करू शकते. जे लोक ब्लड थिनर औषधे घेतात, त्यांच्यासाठीही मेथी नुकसानदायक ठरू शकते.थायरॉईडचा गंभीर त्रास असल्यास किंवा शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर मेथी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मेथीच्या पानांचे दुष्परिणाम

मेथीची पाने जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी, गॅस, पोट फुगणे आणि जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात. काही लोकांमध्ये लघवीचा किंवा शरीराच्या वासात बदल जाणवू शकतो.

मेथी कोणत्या आजारात फायदेशीर आहे?

मेथीचे भाजी डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच कोलेस्टेरॉल कमी करणे, पचन सुधारणे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

हिरवी मेथी खाण्याचे फायदे आणि तोटे

हिरवी मेथी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. मात्र, गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास पोटाच्या तक्रारी, ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Despite Benefits, Fenugreek Can Be Harmful for Some: Know Who Should Avoid

Web Summary : Fenugreek, though nutritious, isn't for everyone. Those with allergies, digestive issues, low blood pressure, or taking blood thinners should limit or avoid it. It's beneficial for diabetes, cholesterol, and digestion when consumed moderately.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य