पचनाला हलके, आरामदायी आणि सुरळीत ठेवण्यासाठी आपल्या आहारात काही लहान पण प्रभावी खाद्यपदार्थ असतात. जसे बडीशेप, जवस, पांढरे तीळ आणि विविध पाचक मिश्रणे. हे पदार्थ भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळतात आणि जेवणानंतर घेतले तर पचनशक्ती सुधारते, अॅसिडिटी कमी होते आणि पोटाला शांतता मिळते. (Fennel, barley, sesame seeds - these foods work wonders for all stomach problems, see how to eat )त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे ते केवळ तात्पुरता दिलासा देत नाहीत, तर दीर्घकालीन पचन आरोग्यही मजबूत करतात.
बडीशेप पचनासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. तिच्यात असलेले अँटी ऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि काही महत्त्वाचे घटक पोटातील गॅस कमी करतात व पचनक्रिया वेगवान करतात. जेवल्यावर बडीशेप घेतल्यास पोट फुगणे, आंबट ढेकर येणे किंवा जडपणा जाणवणे कमी होते. तिचा सुगंध आणि थंडावा अॅसिडिटी शांत करण्यात मदत करतो. तोंडातून दुर्गंधीही येत नाही.
जवस हे पचनाच्या दृष्टीने एक सुपरफूडच आहे. यात मुबलक ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, विद्रव्य आणि अविद्रव्य फायबर, प्रथिने, लिग्नन्स आणि अनेक सूक्ष्म खनिजे असतात. पांढरे तीळ शरीराला उष्णता आणि ताकद देतात, पण त्याचबरोबर पचनासाठीही ते उपयुक्त आहेत. त्यात असते कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, हेल्दी फॅट्स, प्रथिने, आणि काही महत्त्वाचे अँटी ऑक्सिडंट्स. पाचक पदार्थ जसे की हिंग, जिरे, काळे मीठ, धणे, सुंठ, लवंग इत्यादी घटक असलेले पाचक हे पोटातील रसांचे स्त्रवण वाढवतात. त्यामुळे अन्नाचे विघटन सहज होते आणि जड किंवा तेलकट अन्नसुद्धा लवकर पचते. या मसाल्यांत अँटी ऑक्सिडंट्स. या सर्व पदार्थांचे एकत्रित फायदे म्हणजे पोट हलके राहते, गॅसेस कमी होतात, अपचनाची तक्रार कमी होते आणि शरीराची पोषणशक्ती वाढते.
कृती
१. पांढरे तीळ छान परतून घ्यायचे. नंतर बडीशेप परतायची. तसेच जवसही परतून घ्यायचे. सगळे पदार्थ वेगळे परतायचे म्हणजे व्यवस्थित परतले जातात. त्यात सैंधव मीठ घालायचे. हबावंद डव्यात साठवून ठेवायचे. चवीलाही मस्त लागते.
