Lokmat Sakhi >Food > उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत

उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत

Fasting Special: Make sago paratha - simple recipe : साबुदाण्याचा पराठा करायची अगदी सोपी रेसिपी. उपासासाठी खास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 16:41 IST2025-06-09T16:41:02+5:302025-06-09T16:41:47+5:30

Fasting Special: Make sago paratha - simple recipe : साबुदाण्याचा पराठा करायची अगदी सोपी रेसिपी. उपासासाठी खास.

Fasting Special: Make sago paratha - simple recipe | उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत

उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत

उपासाला तेच तेच पदार्थ करुन कंटाळला असाल तर काही तरी मस्त नवीन करुन पाहा. (Fasting Special: Make sago paratha - simple recipe)साबुदाणा हा उपासाच्या दिवशी राजा असतो. साबुदाण्याचे अनेक पदार्थ आपण करतोच मात्र असा पराठा एकदा नक्की करुन पाहा. चवीला मस्त करायला सोपा.  

साहित्य
साबुदाणा, बटाटा, हिरवी मिरची, जिरे, तूप, मीठ, आलं, पाणी

कृती
१. एका पॅनमध्ये साबुदाणा घ्यायचा. भिजवायची किंवा काहीही करायची गरज नाही. फक्त साधा साबुदाणा घ्या आणि   पॅनमध्ये परता. परतण्यासाठी तेल तूप काही घ्यायचे नाही. पाच ते दहा मिनिटे साबुदाणा परतायचा. परतून झाल्यावर गार होऊ द्यायचा. गार झाल्यावर साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि त्याची पूड तयार करुन घ्या. छान सरसरीत पीठ वाटून घ्यायचे. त्यातील थोडे पीठ बाजूला काढा. जे आपल्याला पराठा लाटताना वापरायचे आहे. 

२. बटाटा उकडून घ्यायचा. उकडलेला बटाटा किसून घ्यायचा. कुसकरुन तो मऊ होत नाही. किसल्यावर मऊ होईल. एका परातीत वाटलेले साबुदाण्याचे पीठ घ्यायचे. त्यात किसलेला उकडलेला बटाटा घालायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. ते तुकडेही पीठात घालायचे. 

३. परातीत चमचाभर जिरे घाला. तसेच आलं किसून घ्यायचे. किसलेले आले ही त्या मिश्रणात घालायचे. वाटीभर साबुदाणा घेतला असेल तर एखादा बटाटा पुरेसा होतो. त्यानुसार अंदाज ठरवा. तूप थोडे गरम करायचे आणि पीठात घालायचे. म्हणजे पराठा खमंग आणि खुसखुशीत होईल.  त्यात चवी पुरते मीठ घालायचे. थोडे थोडे पाणी लावून पीठ मळून घ्यायचे. पोळीसाठी जसे मळता तसेच मळा. बटाट्यामुळे जरा मऊ होईल. 

४. पोलपाटावर पराठा लाटून घ्यायचा. त्यासाठी बाजूला काढलेले साबुदाण्याचे पीठ वापरायचे. लाटलेला पराठा तव्यावर परतायचा. तूप लावायचे आणि छान खमंग परतायचा. जर तुम्हाला उपासाला कोथिंबीर आवडत असेल तर छान बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची.  बरोबर दाण्याची चटणी घेऊ शकता. किंवा साधे दही घ्यायचे. दाण्याची चटणीही करायला अगदी सोपी आहे.      

Web Title: Fasting Special: Make sago paratha - simple recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.