Dark Chocolate Tips : तसे तर चॉकलेट खाणं आरोग्यासाठी, तब्येतसाठी घातक मानले जातात. सतत डॉक्टर चॉकलेट टाळा दमवजा सल्ला देत असतात. पण अनेक हेल्थ एक्सपर्ट डार्क चॉकलेटला तब्येतीसाठी खूप फायदेशीर मानतात. त्यामुळे भरपूर लोक डार्क चॉकलेट खातात. पण यातही उठले आणि भसाभसा डार्क चॉकलेट (Dark Chocolate Buying Tips) खात सुटले असं करणंही महागात पडू शकतं.
डार्क चॉकलेटमध्ये (Dark Chodolate Benefits) आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक, फायबर आणि प्रोटीन असे पोषक तत्व भरपूर असतात. इतकंच नाही तर हे चॉकलेट हृदयासोबच मानसिक आरोग्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि ब्लड शुगर मॅनेज करण्यासही मदत करतात. पण हे डार्क चॉकलेट खरेदी करताना ३ गोष्टींकडे लक्ष देण्याबाबत न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी माहिती दिली आहे.
एक्सपर्ट सांगतात की, डार्क चॉकलेट फायदेशीर असलं तरी त्याचे फायदे यावर अवलंबून असतात की, आपण कोणतं चॉकलेट खात आहात, कोणत्या ब्रॅन्डचं चॉकलेट खात आहात. अशात पाहुयात डार्क चॉकलेट खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
हवं ७० टक्के डार्क
जेव्हाही डार्क चॉकलेट घ्यायला जाल तेव्हा हे बघा की, त्यात कोकोचं प्रमाण किती आहे. डार्क चॉकलेट हे ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक डार्क चॉकलेट असावं. तेव्हाच फायदे मिळतील. यात अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. जे मेंदू आणि आतड्यांसाठी फायदेशीर असतात.
शुगर बघा
काही ब्रॅंड डार्क चॉकलेटमध्ये खूप जास्त शुगर टाकतात. अशात रॅपरवर चेक करा की, शुगर हे पहिलं इंग्रीडिएंट असू नये. त्यात जास्त आर्टिफिशिअल शुगर नसल्याचं देखील चेक करा. तेव्हा ते खरेदी करा. जर जास्त शुगर असेल तर आपली शुगर वाढू शकते.
इंग्रीडिएंट लिस्ट
बरेच लोक एखादी वस्तू खरेदी करताना त्यात काय आहे काय नाही हे चेक करतात. पण बरेच असं करत नाहीत. पण हे महत्वाचं आहे. इंग्रीडिएंट लिस्ट जेवढी लहान असेल डार्क चॉकलेट तेवढं फायदेशीर ठरेल. शिवाय डार्क चॉकलेट खूप जास्त प्रमाणातही खाऊ नये.
जास्त खाऊन जास्त फायदा असं नाही
जर आपल्याला वाटत असेल की, आपण जास्त डार्क चॉकलेट खाऊ तर जास्त फायदा मिळेल. तर हा विचार चुकीचा आहे. हेल्थ एक्सपर्टनुसार, एका दिवसात २० ते ३० ग्रॅम म्हणजे १ ते २ छोटे तुकडे डार्क चॉकलेट खाणं ठीक आहे. जर यापेक्षा जास्त खाल तर शुगर आणि कॅफीनचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळे झोप बिघडू शकते आणि तब्येतही बिघडू शकते.
डार्क चॉकलेटचे फायदे
- डार्क चॉकलेट नियमितपणे खाल तर हृदय निरोगी राहतं आणि हार्ट डिजीजचा धोका कमी होतो.
- डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशिअम असतं, ज्यामुळे मूड चांगला होतो आणि स्ट्रेसही कमी होतो.
- डार्क चॉकलेट त्वचेसाठीही फायदेशीर असतं. यातील अॅंटी-ऑक्सीडेंट्स आणि फ्लेवोनॉइड स्किन डॅमेज होण्यापासून बचाव करतात. तसेल ब्लड सर्कुलेशनही वाढवतात.
- डार्क चॉकलेटनं मेंदूच्या क्रियांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि अल्झायमरसारखा आजार रोखण्यासही मदत मिळू शकते.