Join us

चवीची खास बंगाली जादू अनुभवा, उन्हाळ्यात खा पंता भात-दही भाताचाच एक गारेगार प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 18:20 IST

Experience the special Bengali magic of taste, eat Panta rice- a delicious variety of rice : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा भात खाणे शरीरासाठी ठरेल फायद्याचे. पाहा अगदी सोपी रेसिपी.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विविध ठिकाणी काही खास पदार्थ खाल्ले जातात. बंगालमध्ये तसेच इतरही काही ठिकाणी पंता भात नावाचा एक पदार्थ खाल्ला जातो. (Experience the special Bengali magic of taste, eat Panta rice- a delicious variety of rice)दही भातासारखीच याची रेसिपी आहे, मात्र हा भात फर्मेंट केला जातो. अत्यंत पौष्टिक असा हा भात नाश्त्याला खाऊ शकता. तसेच जेवणातही घेऊ शकता. चवीला फार छान लागतो करायला खुपच सोपा आहे. पोटाला थंडावा मिळतो आणि पित्ताचा वगैरे काही त्रास होत नाही. 

साहित्य भात, दही, लाल मिरची, मोहरी, तेल(मोहरीचे तेल), लसूण, पाणी, कांदा 

कृती१. शिजलेला भात रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचा. एका मातीच्या भांड्यात पाणी घ्या. त्यात भात घाला आणि रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी भात मऊ मोकळा होईल. (Experience the special Bengali magic of taste, eat Panta rice- a delicious variety of rice)भातावर पांढरा थर तयार झाला असेल. तो काढून नका तो थर पौष्टिक असतो. शरीरासाठी चांगला असतो. 

२. त्या भातात थोडे छान गोड असे दही घाला. दही घातल्यावर त्यात चवीपुरते मीठ घाला. पाणचट भात खायची आपल्याला सवय नसते त्यामुळे भातात दही घालण्याआधी थोडं पाणी कमी केले तरी चालेल. भात छान ढवळून घ्यायचा.

३. एका फोडणी पात्रात थोडं मोहरीच तेल घ्या. मोहरीच्या तेलाची अनेकांना सवय नसते. त्यामुळे वासाचा त्रास होतो. अशावेळी  मोहरीचे तेल न वापरता साधे तेल घ्यायचे. किंवा मग तूप घेतले तरी चालते.  फोडणी पात्रात तेल घातल्यावर त्यात लाल मिरचीचे तुकडे घाला आणि छान परतून घ्या. मग त्यात मोहरी घाला लसणाचे बारीक तुकडे घाला खमंग परतून झाल्यावर भातावर ओता. 

४. कांदा छान बारीक चिरुन घ्या. कांदा तसाच कच्चा भातात घाला छान कालवा आणि खा. हा पंता भात नुसता खाल्ला जात नाही. त्याबरोबर खायला एक सोपा प्रकार केला जातो. उकडलेल्या बटाट्याला कुसकरून घ्यायचे आणि मग त्यात फोडणी घालायची. कांदा घालायचा. लाल मिरचीचा चुरा घालायचा. अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करुन पाहा.      

टॅग्स :अन्नआहार योजनापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.