Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मुलंही मटामटा खातील मटकी भात, शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांत होणारी चमचमीत झटपट रेसिपी

मुलंही मटामटा खातील मटकी भात, शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांत होणारी चमचमीत झटपट रेसिपी

Even kids will eat Matki Bhaat, a quick and easy recipe for tiffin that can be made in 10 minutes : मटकीचा भात करण्याची सोपी पद्धत. पाहा कसे करायचा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 17:41 IST2026-02-03T18:16:41+5:302026-02-04T17:41:08+5:30

Even kids will eat Matki Bhaat, a quick and easy recipe for tiffin that can be made in 10 minutes : मटकीचा भात करण्याची सोपी पद्धत. पाहा कसे करायचा.

Even kids will eat Matki Bhaat, a quick and easy recipe for tiffin that can be made in 10 minutes | मुलंही मटामटा खातील मटकी भात, शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांत होणारी चमचमीत झटपट रेसिपी

मुलंही मटामटा खातील मटकी भात, शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांत होणारी चमचमीत झटपट रेसिपी

खिचडी, फोडणीचा भात असे पदार्थ आपण कायम खातच असतो. भाताचे अनेक प्रकार केले जातात. त्यापैकी एक मस्त प्रकार म्हणजे मटकी भात.  मटकी भात हा रोजच्या जेवणात सहज करता येणारा आणि शरीराला भरपूर पोषण देणारा पारंपरिक पदार्थ आहे. कमी वेळात तयार होतो म्हणून तो  डब्यासाठीही अगदी योग्य ठरतो, तसेच चव आणि आरोग्य दोन्हीसाठी उत्तम.  (Even kids will eat Matki Bhaat, a quick and easy recipe for tiffin that can be made in 10 minutes)मटकी ही प्रथिनांनी समृद्ध असते. शरीराला ऊर्जा देणे, स्नायू मजबूत ठेवणे आणि पोट भरलेले ठेवणे यासाठी मटकी उपयुक्त ठरते. भातासोबत मटकी खालल्यामुळे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे संतुलित मिश्रण मिळते, जे रोजच्या आहारासाठी फायदेशीर आहे.

साहित्य 
मटकी, कांदा, तांदूळ, पाणी, हिरवी मिरची, टोमॅटो, हळद, बटाटा, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, कसुरी मेथी, तेल, लसूण 

कृती
१. मटकी रात्रभर भिजत ठेवायची. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. टोमॅटो बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची, स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. बटाट्याचे तुकडे करायचे. 

२. एका कुकरमध्ये तेल घ्यायचे. तेल गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेला लसूण घालून परतून घ्यायचे. कांदा छान गुलाबी परतला की त्यात टोमॅटो घालायचा. तसेच बटाट्याचे तुकडे घालायचे. सगळं छान परतून घ्यायचं. त्यात मटकी घालायची. थोडे मीठ घालायचे आणि हळद घालायची. तसेच लाल तिखटही घालायचे. गरम मसाला घाला आणि जरा परता. 

३. त्यात पाणी घाला आणि मटकी शिजू द्या. नंतर त्यात धुतलेले तांदूळ घालायचे आणि उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर पाण्याचा अंदाज घ्यायचा आणि मग कुकर लावायचा. खिचडी छान शिजली की गॅस बंद करा. कुकर उघडला की गरमागरम मटकी भात खा. वरतून तूप आणि लसूण चटणी घ्या चव आणखी मस्त लागेल.

Web Title : झटपट मटकी भात रेसिपी: 10 मिनट में तैयार, लंचबॉक्स के लिए परफेक्ट

Web Summary : मटकी भात एक पौष्टिक और पारंपरिक व्यंजन है, जो जल्दी तैयार हो जाता है और लंचबॉक्स के लिए आदर्श है। मटकी प्रोटीन और ऊर्जा प्रदान करती है। चावल के साथ, यह एक संतुलित, स्वस्थ भोजन बनता है।

Web Title : Quick & Easy Matki Bhaat Recipe: Perfect Lunchbox in 10 Minutes

Web Summary : Matki Bhaat, a nutritious and traditional dish, is quick to prepare, ideal for lunchboxes. Matki offers protein and energy. With rice, it creates a balanced, healthy meal.