Lokmat Sakhi >Food > डाएट करत असाल तरी बिंधास्त खा सोयाबिनची पौष्टिक भाजी, ‘असा’ सोयाबिन मसाला म्हणजे चव चमचमीत

डाएट करत असाल तरी बिंधास्त खा सोयाबिनची पौष्टिक भाजी, ‘असा’ सोयाबिन मसाला म्हणजे चव चमचमीत

Even if you are on a diet, eat soybeans regularly, a nutritious vegetable : सोयाबिनची अशी भाजी एकदा करुन पाहा. सोयाबिन नक्कीच आवडायला लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 16:51 IST2025-05-30T16:51:02+5:302025-05-30T16:51:45+5:30

Even if you are on a diet, eat soybeans regularly, a nutritious vegetable : सोयाबिनची अशी भाजी एकदा करुन पाहा. सोयाबिन नक्कीच आवडायला लागेल.

Even if you are on a diet, eat soybeans regularly, a nutritious vegetable | डाएट करत असाल तरी बिंधास्त खा सोयाबिनची पौष्टिक भाजी, ‘असा’ सोयाबिन मसाला म्हणजे चव चमचमीत

डाएट करत असाल तरी बिंधास्त खा सोयाबिनची पौष्टिक भाजी, ‘असा’ सोयाबिन मसाला म्हणजे चव चमचमीत

सोयाबिन हा पदार्थ आपण महाराष्ट्रात तसा कमीच खातो. बाकी भारतातील विविध भागांत सोयाबिनाला फार मागणी आहे. (Even if you are on a diet, eat soybeans regularly, a nutritious vegetable)सोयाबिनची चव फार लोकांना आवडत नाही. मात्र सोयाबिन पौष्टिक असते. वजन कमी करण्यासाठी जर डाएट करत असाल तर त्यात सोयाबिनचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. सोयाबिनचे अनेक पदार्थ करता येतात. करायला वेळ मात्र फार मोडतो. पण ही सोयाबिनची भाजी अगदी झटपट करता येते. चवीला छान लागते. या पद्धतीने केलेली भाजी तुम्हालाही नक्कीच आवडेल. पाहा कशी कराल.    

साहित्य 
सोयाबिन, सिमला मिरची, कांदा, दही, टोमॅटो, पाणी, हळद, लाल तिखट, जिरं, धणे- जिरे पूड, कसुरी मेथी, मीठ तमालपत्र 

कृती
१. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवायचे. पाणी गरम झाल्यावर त्यात सोयाबिन घालायचे. सोयाबिन पाच मिनिटांसाठी उकळवायचे. मग गॅस बंद करायचा आणि त्यात मीठ घालायचे. थोड्या वेळाने सोयाबिन जरा कोमट झाल्यावर हाताने दाबून त्याचे पाणी काढायचे. पाणी काढून झाल्यावर एका पातेल्यात काढून घ्यायचे. त्यात थोडे दही घालायचे. तसेच चमचाभर हळद घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. थोडी धणे - जिरे पूड घालायची. हातावर कसुरी मेथी चुरायची आणि त्यात घालायची. मीठ घालायचे. सगळे छान मिक्स करायचे. 

२. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. त्यात तमालपत्र घालायचे. तसेच थोडे जिरे घालायचे. जिरे फुलल्यावर त्यात चौकोनी चिरलेली सिमला मिरची घालायची. सिमला मिरची परतायची. मग त्यात छान बारीक चिरलेला कांदा घालायचा. 

३. एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे घ्यायचे. टोमॅटोची पेस्ट करायची. फोडणीत घालायची. छान परतायची. टोमॅटोची पेस्ट घट्ट होईपर्यंत सगळं छान परतायचे. त्यात उकळी आली की थोडे पाणी घालायचे. पाणी आटू द्यायचे. पाणी आटल्यावर त्यात पिळलेले सोयाबिनचे तुकडे घालायचे. व्यवस्थित मिक्स करुन घ्यायचे. झाकण ठेवायचे. आणि भाजीला एक वाफ काढून घ्यायची. भाजी जरा घट्ट झाली की गॅस बंद करायचा.                

Web Title: Even if you are on a diet, eat soybeans regularly, a nutritious vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.