टोमॅटो आपल्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. भाजी, आमटी, कोशिंबीर आदी पदार्थ करताना टोमॅटो वापरला जातो. त्याची चव, रसाळपणा आणि पौष्टिक गुणधर्म यामुळे तो रोजच्या जेवणात वापरला जातो. (Eating tomato seeds can be dangerous, people with 'this' problem should not eat them by mistake also because...)अगदी रोज नाही तरी दर दोन दिवशी टोमॅटो घरी नक्कीच वापरला जातो. टोमॅटो आरोग्यासाठी तसा धोक्याचा वगैरे नाही मात्र टोमॅटोतील बिया खाणे काही बाबतीत त्रासदायक ठरु शकते. या बियांमध्ये फायबर असते इतरही पोषण असते. मात्र सगळ्यांनाच त्या बिया पचत नाहीत. काही जणांना त्याचा त्रास होतो. काही लोकांनी या बिया खाणे टाळलेलेच योग्य ठरते. या बिया अतिप्रमाणात पोटात गेल्या तर ते कोणासाठीच चांगले नाही. मात्र पचनाची काहीही समस्या नसणाऱ्यांना या बिया अजिबात बाधत नाहीत. त्या उलट काही पचनाचा त्रास असेल तर या बियांमुळे त्यात वाढ होऊ शकते.
गॅसेसचा त्रास असेल काहीही खाल्ले तरी पोट फुगते तर मग या बिया काढूनच टोमॅटो वापरा. या बियांमुळे पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होतो. आम्लपित्ताचा त्रास अनेकांना असतो. या त्रासामुळे सतत उलट्या आणि अपचन होते. जर आम्लपित्ताचा त्रास असेल तर टोमॅटोच्या बिया खाणे टाळाच. टोमॅटोच्या बिया मऊ असल्या तरी त्या पचायला जड असतात. त्या पचायला जरा जास्तच वेळ लागतो आणि त्यामुळे पचानात अडथळा येतो. या बिया शरीरातील आम्ल वाढवण्याचे काम करतात. मूत्रपिंडात खडे होण्याची प्रवृत्ती असलेल्या लोकांनीही टोमॅटोच्या बिया खाऊच नयेत. कारण या बियांमध्ये ऑक्सलेट्स नावाचे घटक असतात, जे पोटात खडे होण्यास कारणीभूत ठरू शकतात. तसेच पचनक्रिया मंद असणाऱ्या,,वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होणाऱ्या लोकांनीही या बिया खाणे टाळा.
याशिवाय लहान मुले किंवा पचनसंस्था नाजूक असणाऱ्या वृद्धांनी टोमॅटोतील बिया वेगळ्या करुन फक्त गर खावा. एकूणच बिया खाल्ल्याने काही गंभीर त्रास होत नाही. परंतु आधीच आजार असलेल्या लोकांनी त्यापासून दूर राहणे योग्य ठरते.