पनीरचे विविध प्रकार आपण करतच असतो. पनीरच्या भाजीतही अनेक रेसिपी असतात. पण तुम्ही कधी पनीर कुर्मा खाल्ला आहे का? करायला अगदी सोपी असलेली ही भाजी, चवीला एकदम भारी असतो. (Eating hot paneer kurma is a pleasure, the red gravy and soft paneer goes well together )शिवाय पोळी, पराठा, भात, भाकरी साऱ्यासोबत मस्त लागते. एकदा नक्की करुन पाहा. डब्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे. तसेच अगदी कमी वेळात होते.
साहित्य
तेल, कांदा, टोमॅटो, काजू, पनीर, कसुरी मेथी, दही, तमालपत्र, वेलची, काळीमिरी, जिरे, मीठ, लाल तिखट, हळद, धणे - जिरे पूड, बटर
कृती
१. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. कांदा चिरायचा आणि तेलावर परतायचा. लालसर होईपर्यंत परतायचा. जळणार नाही याची काळजी घ्यायची. काजूही परतून घ्यायची. कांदा आणि काजू जरा गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात थोडे दही घालायचे आणि त्याची मध्यम घट्ट पेस्ट तयार करायची. टोमॅटोची पेस्ट करायची. कच्चे टोमॅटोच वापरा. अति पातळ करु नका.
२. कढईत तेल गरम करायचे. त्यात पनीरचे तुकडे परतायचे. खमंग परतून घ्या. दोन्ही बाजूनी सोनेरी परतायचे. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. त्यावर चमचाभर जिरे परतायचे. तसेच तमालपत्र घ्यायचे. वेलची घ्यायची. थोडी काळीमिरी घ्यायची. फोडणी मस्त परतून घ्यायची. चमचाभर हिंग घालायचे. मग त्यात टोमॅटोची प्युरी घालायची. ढवळायची आणि छान वाफ काढून घ्यायची.
३. त्यात तयार केलेली पेस्ट घालायची. ढवळायची परत वाफ काढायची. त्यात हळद, लाल तिखट, धणे- जिरे पूड घाला. मीठ घाला. ढवळून घ्या. भाजी जरा घट्टसर झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे घालायचे. भाजी छान ढवळायची. हातावर कसुरीमेथी मळायची आणि घालायची. ढवळायचे आणि गरज असेल तर थोडे पाणी घालायचे. चमचाभर बटर घाला आणि भाकरी किंवा चपातीसोबत खा.
