पडवळ हा पचायला हलका आणि पौष्टिक मानला जातो. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि पचनक्रिया सुधारते. पडवळात जीवनसत्त्व ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्स, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न अशी महत्त्वाची खनिजे मिळतात. (Eat this protein-packed curry, easy to make and absolutely delicious)यात फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. पडवळामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कमी कॅलरिज असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही ते उत्तम मानले जाते. पडवळची पौष्टिक भाजी करण्याची सोपी रेसिपी पाहा.
साहित्य
पडवळ, मीठ, तेल, हिंग, हिरवी मिरची, हळद, मोहरी, जिरे, कांदा, कडीपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, चणाडाळ
कृती
१. चणाडाळ भिजवायची. किमान अर्धा तास तरी भिजवायची. म्हणजे ती मऊ होते आणि चवीला छान लागते. पडवळ मधोमध चिरायचा. त्यातील बिया काढून घ्यायच्या. मध्यम आकाराचे तुकडे करायचे. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे.
२. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरे फुलल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. नंतर त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता छान परतायचा. मग हिंगही घाला आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे.
३. त्यात हळद घालायची. तसेच बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि परतून घ्यायचा. त्यात मीठ घाला. लाल तिखट घाला. तसेच गरम मसाला घालायचा. चिरलेला पडवळ घालायचा मस्त परतायचा. परतून झाल्यावर त्यात भिजवलेली चणाडाळ घालायची, परतून घ्यायची. झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. भाजी आणि डाळ शिजल्यावर छान परतायची.
