गोड पदार्थ म्हटले की तोंडाला पाणी सुटते. पण मग खाताना मनात वजनाबद्दल विचार येतो. एक चमचा साखरेमध्ये जवळपास ५० कॅलरीज असतात.( Eat these healthy brownies without any worries, no tension about gaining weight..) चमचाभर साखरही वजन वाढवते हे तर आपण जाणून आहोत. हे ही खरं की सगळ्या प्रकारच्या चवींचा समावेश आहारात हवा. शरीरासाठी सगळ्या चवी महत्त्वाच्या असतात. अशावेळी काय कराल? मुळात साखर हाच गोडवा देणारा पदार्थ आहे असे नाही काही हेल्दी पर्यायही आहेतच. ( Eat these healthy brownies without any worries, no tension about gaining weight..)
जसे की गूळ आहे. मध आहे. विविध फळे आहेत. इतरही अनेक पदार्थ आहेत. मग त्यांचा वापर करून गोड पदार्थ तयार करण्यात काहीच हरकत नाही. डाएटही होईल आणि मनाला समाधानही मिळेल. अशा अनेक रेसिपी आहारतज्ज्ञ शेअर करत असतात. ( Eat these healthy brownies without any worries, no tension about gaining weight..)असे पदार्थ शोधणे आपल्यासाठीही काही अशक्य नाही. नवीन काही तयार करायचे. चांगले झाले तर मग इतरांनाही खाण्याचा सल्ला द्यायचा. असाच प्रयोगातून तयार झालेला हा पदार्थ म्हणजे हेल्दी ब्राऊनी. ब्राऊनी हा केकचाच एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही. तरुण वर्गात तर तो फार लोकप्रिय आहे. पाहा हेल्दी ब्राऊनीची रेसिपी.
साहित्य
केळी, नाचणीचे पीठ, कोको पावडर, गूळाची पावडर, बेकींग सोडा, तूप, दूध, डार्क चॉकलेट
कृती
१. दोन केळी घ्या. ती छान स्मॅश करा पेस्ट तयार करून घ्या. मिक्सरमध्ये करायची गरज नाही चमच्याने करता येते.
२. केळी कुसकरुन झाल्यावर त्यामध्ये एक कप नाचणीचे पीठ घाला. ज्याला आजकाल रागी म्हणूनच ओळखले जाते. एक कप नाचणीचे पीठ घेतल्यावर एक कप गूळाची पावडर घ्यायची. प्रमाण नीट वापरा म्हणजे चव बॅलेंन्स राहते. त्यामध्ये पाव कप कोको पावडर घाला.
३. चमचाभर बेकींग पावडर घाला. तसेच अर्धा कप पातळ केलेले तूप वापरा. कपभर दूध वापरा. जर मिश्रण फारच घट्ट होत असेल तर अजून थोडे दूध वापरा.
४. सगळं छान मिक्स करून घ्या. एकजीव झाले पाहिजे. नंतर त्या बॅटरवर डार्क चॉकलेटचे तुकडे टाका. मग ओव्हन असेल तर ओव्हन वापरा नसेल तर कुकर वापरा.
५. कुकरमध्ये मीठ घाला त्यावर उलटी ताटली ठेवा आणि त्यामध्ये ब्राऊनी तयार करायला ठेवा ४० मिनिटे ठेवा. गार झाल्यावर चौकोनी कापून घ्या.