Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > दक्षिण भारतीय घरातली पारंपरिक भाजलेल्या चणाडाळीची चटणी खा, उन्हाळ्यात डोसे-इडल्यांची बदलून जाईल चव

दक्षिण भारतीय घरातली पारंपरिक भाजलेल्या चणाडाळीची चटणी खा, उन्हाळ्यात डोसे-इडल्यांची बदलून जाईल चव

Eat the traditional chutney from South India, taste is so good that you will love it : घरीच करा मस्त चविष्ट चणाडाळीची चटणी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 16:17 IST2026-03-17T16:15:27+5:302026-03-17T16:17:12+5:30

Eat the traditional chutney from South India, taste is so good that you will love it : घरीच करा मस्त चविष्ट चणाडाळीची चटणी.

Eat the traditional chutney from South India, taste is so good that you will love it | दक्षिण भारतीय घरातली पारंपरिक भाजलेल्या चणाडाळीची चटणी खा, उन्हाळ्यात डोसे-इडल्यांची बदलून जाईल चव

दक्षिण भारतीय घरातली पारंपरिक भाजलेल्या चणाडाळीची चटणी खा, उन्हाळ्यात डोसे-इडल्यांची बदलून जाईल चव

साऊथ इंडियन जेवणात चटण्यांना खूप महत्त्व असतं. नारळाची चटणी, टोमॅटो चटणी, पुदिन्याची चटणी यांसोबतच एक खास आणि चवदार प्रकार म्हणजे चणाडाळीची चटणी. साधी, झटपट आणि पौष्टिक अशी ही चटणी अनेकांना आवडते. चणाडाळीमुळे या चटणीला एक वेगळंच टेक्स्चर आणि चव येते. ही चटणी खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, कारण चणाडाळ प्रोटीनने समृद्ध असते. त्यामुळे ही फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

साऊथमध्ये ही चटणी प्रामुख्याने इडली, डोसा, वडा यांसोबत खाल्ली जाते. मात्र तिची चव इतकी छान असते की पोळी, भाकरी किंवा अगदी साध्या भातासोबतही ती तितकीच रुचकर लागते. हलकीशी तिखट, किंचित आंबट आणि भाजलेल्या डाळीचा खास फ्लेवर  यामुळे ही चटणी जेवणाची लज्जत वाढवते.

साहित्य 
चणाडाळ, हिरवी मिरची, ओलं खोबरं, पाणी, जिरे, तेल, मोहरी, कडीपत्ता, आलं, लसूण, मीठ, हिंग, चिंच , सुकी लाल मिरची

कृती
१. एका कढईत थोडं तेल घ्यायचं. गरम करायचं आणि त्यात वाटीभर चणाडाळ घालायची. चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. कडीपत्ता घालायचा. आल्याचा तुकडा घालायचा. चिंच घालायची. मस्त परतून घ्यायचं. 

२. ताजा नारळ खवायचा. मस्त ओलं खोबरं आणि परतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात जिरे घालायचे आणि पाणी घालायचे. त्याची छान चटणी वाटून घ्यायची. चटणी वाटून एकजीव झाल्यावर एका वाडग्यात काढून घ्यायची. 

३. फोडणीपात्रात तेल घ्यायचे. तेल छान गरम झाले की त्यात कडीपत्ता घालायचा. तसेच हिंग घालायचे. मोहरी घालायची. थोडं जिरं घाला आणि परतून घ्या. सुकी लाल मिरची तोडून घाला. फोडणी छान परतली की चटणीत ओतायची. चवीनुसार मीठ घालायचे. चटणी ढवळून घ्यायची.    

Web Title : दक्षिण भारतीय भुनी चना दाल चटनी: स्वादिष्ट, बनाने में आसान।

Web Summary : दक्षिण भारतीय चना दाल की चटनी एक सरल, पौष्टिक व्यंजन है, जो इडली, डोसा या चावल के साथ एकदम सही है। भुनी हुई दाल, मसाले और नारियल एक अनोखा स्वाद बनाते हैं। यह प्रोटीन से भरपूर और स्वस्थ है।

Web Title : South Indian roasted chana dal chutney recipe: Delicious, easy to make.

Web Summary : South Indian chana dal chutney is a simple, nutritious dish, perfect with idli, dosa, or even rice. Roasted dal, spices, and coconut create a unique flavor. It is protein-rich and healthy.