Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात नाचणी खा-पोटाला ‌थंडावा, पाहा उन्हाळ्यात नाचणी खाण्याचे ५ फायदे-पारंपरिक अन्नाची जादू

उन्हाळ्यात नाचणी खा-पोटाला ‌थंडावा, पाहा उन्हाळ्यात नाचणी खाण्याचे ५ फायदे-पारंपरिक अन्नाची जादू

Eat Ragi in Summer for a Cooling Effect – Discover 5 Benefits of This Traditional Superfood : नाचणी खाणे आरोग्यासाठी फार चांगले. उन्हाळ्यात तर खाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 17:00 IST2026-03-17T16:59:38+5:302026-03-17T17:00:53+5:30

Eat Ragi in Summer for a Cooling Effect – Discover 5 Benefits of This Traditional Superfood : नाचणी खाणे आरोग्यासाठी फार चांगले. उन्हाळ्यात तर खाच.

Eat Ragi in Summer for a Cooling Effect – Discover 5 Benefits of This Traditional Superfood | उन्हाळ्यात नाचणी खा-पोटाला ‌थंडावा, पाहा उन्हाळ्यात नाचणी खाण्याचे ५ फायदे-पारंपरिक अन्नाची जादू

उन्हाळ्यात नाचणी खा-पोटाला ‌थंडावा, पाहा उन्हाळ्यात नाचणी खाण्याचे ५ फायदे-पारंपरिक अन्नाची जादू

उन्हाळा सुरु झाला की आहार हलका, पचायला सोपा आणि शरीराला थंडावा देणारा असावा लागतो. त्यासाठी विविध पदार्थांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते त्यापैकीच एक नाचणी (रागी) हा एक उत्तम पर्याय ठरतो. पारंपरिक भारतीय आहारातील हा पौष्टिक घटक उन्हाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. (Eat Ragi in Summer for a Cooling Effect – Discover 5 Benefits of This Traditional Superfood)नाचणी थंड असते, त्यामुळे ती शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. उन्हामुळे येणारा थकवा, अशक्तपणा आणि डिहायड्रेशन कमी करण्यासाठी नाचणीचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो. शिवाय ती पचायला हलकी असल्याने पोटावर ताण येत नाही आणि दिवसभर हलकं वाटतं.

नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ती फायदेशीर ठरते. यासोबतच नाचणीत फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. उन्हाळ्यात पटकन थकवा येतो, अशा वेळी नाचणी शरीराला नैसर्गिक ऊर्जा देते आणि दिवसभर उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच नाचणी खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.

त्वचेसाठीही नाचणी फायदेशीर आहे. तिच्यातील अँटी ऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात आणि उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी मदत करतात. नाचणीचा आहारात समावेश करणेही खूप सोपे आहे. नाचणीची भाकरी, सत्व, डोसा किंवा पेज अशा विविध प्रकारांनी ती सहज खाता येते. विशेषतः सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात नाचणी घेतल्यास अधिक फायदे मिळतात.

एकूणच, उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी नाचणी हा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. थंडावा देणारी, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि पचायला हलकी अशी नाचणी रोजच्या आहारात असली तर उन्हाळ्यातील अनेक त्रास सहज टाळता येतात. त्यामुळे या उन्हाळ्यात नाचणी आहारात नक्कीच असायला हवी. डोसा करा आंबील करा किंवा इतरही पदार्थ करता येतात. विविध प्रकारे आहारात घ्या. 

Web Title : इस गर्मी में रागी खाएं: पारंपरिक ठंडक देने वाले भोजन के 5 फायदे

Web Summary : गर्मी में रागी शरीर को ठंडा रखता है, थकान और डिहाइड्रेशन से बचाता है। कैल्शियम और फाइबर से भरपूर, यह पाचन में मदद करता है, ऊर्जा बढ़ाता है और वजन को नियंत्रित करता है। इसे भाकरी, डोसा या दलिया के रूप में आनंद लें।

Web Title : Eat Ragi this Summer: 5 Benefits of Traditional Cooling Food

Web Summary : Ragi cools the body in summer, preventing fatigue and dehydration. Rich in calcium and fiber, it aids digestion, boosts energy, and controls weight. Enjoy it as bhakri, dosa, or porridge for optimal health.