काही पदार्थ खास म्हणजे भाज्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात मात्र त्याची चव लोकांना आवडत नसल्यामुळे खाल्या जात नाहीत. जसे की शेपू , मुळा, कारलं, आदी. (Eat radish and avoid indigestion! Make this radish recipe , east to make quick recipe)जरा वेगळ्या पद्धतीने या भाज्या केल्या तर त्याची चव बदलता येते. मुळ्याची कोशिंबीर किंवा नुसता मुळा खायला अनेकांना आवडत नाही. मात्र मुळा ही फळभाजी आरोग्यासाठी फार फायद्याची असते. पचनासाठी मुळा मदत करतो. इतरही अनेक फायदे असतात. मुळा जर आवडत नसेल तर एकदा मुळ्याचा असा चटका करुन पाहा. चवीला एकदम भारी लागतो. त्यात मुळा आहे हे सांगावेच लागेल. करायलाही एकदम सोपा पदार्थ आहे.
साहित्य
हिरवी मिरची, चणाडाळ, मुळा, लिंबू, मीठ, साखर, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कोथिंबीर
कृती
१. चणाडाळ अगदी स्वच्छ धुवायची. तसेच किमान २ ते ३ तास भिजवायची. चणाडाळ जरा मऊ झाली की त्यातील पाणी काढून टाकायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. हिरवी मिरची आणि चणाडाळ वाटून घ्यायची. जरा जाडसरच वाटायची. अगदी त्याचा लगदा करु नका.
२. छान ताजा मुळा घ्यायचा. मुळा सोलायची खरी गरज नसते. तरी त्यावरुन सुरी फिरवून जरा साफ करुन घ्यायचा. स्वच्छ धुवायचा आणि बारीक किसून घ्यायचा. एकदम छान बारीक किसल्यावर त्याला पाणी सुटते त्यातील थोडे पाणी वगळायचे म्हणजे चटका जास्त कडवट लागत नाही. अगदी मुळा पिळून सगळा रस काढू नका. वाटलेली चणाडाळ आणि मुळ्याचा किस एकत्र करा. एकजीव करुन घ्या.
३. एका फोडणीपात्रात थोडे तेल घ्या. तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला आणि मोहरी तडतडू द्या. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घाला आणि मग हिंग घाला. गॅस बंद करा नंतर चमचाभर हळद घाला फोडणी लगेच मुळ्याच्या मिश्रणावर ओता. त्यात थोडी साखर घाला. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. मिश्रणात कोथिंबीरही घाला. लिंबाचा रस घाला थोडावेळ झाकून ठेवा आणि मग एकदा ढवळून चपाती किंवा भाकरीसोबत खा.