Join us
Daily Top 2Weekly Top 5

पनीर खुर्चन खाल्ले का? पनीरची अशी ‘फ्लेवरफूल’ भाजी तुम्ही खाल्लीच नसेल-चवीचा धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 17:35 IST

Eat Paneer Khurchan, such a 'flavorful' recipe of Paneer - an explosion of taste : पनीरची अशी भाजी नक्की करा. पनीर खुर्चन करण्याची रेसिपी.

पनीरच्या विविध चविष्ट रेसिपी आपण सतत करतो. पनीरची भाजी अनेक प्रकारे केली जाते. एखादा खास प्रसंग असेल किंवा पाहुणे येणार असतील तर पनीरची भाजी आवर्जून केली जाते. मात्र त्याच ठराविक काही रेसिपी करुन कंटाळा येतो. (Eat Paneer Khurchan, such a 'flavorful' recipe of Paneer - an explosion of taste)परत पनीर करताना आता एकदा हे रेसिपी ट्राय करुन पाहा. पनीर खुर्चन हा एक फार लोकप्रिय असा पदार्थ आहे. करायला सोपी आणि फ्लेवरफुल अशी भाजी आहे. 

साहित्य पनीर, दही, हळद, आलं, लसूण, जिरे - धणे पूड, मिरी पूड, बेसन, तेल, कसुरी मेथी, लाल तिखट, मीठ, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, पाणी, बटर

कृती१. कांदा सोलायचा आणि लांब - पातळ काप करायचे. तसेच एक कांदा अगदी बारीक चिरायचा. टोमॅटोचेही लांब पातळ काप करायचे आणि दोन टोमॅटोची पेस्ट तयार करायची. हिरवी मिरची बारीक चिरायची. सिमला मिरचीचे लांब - पातळ काप करायचे. 

२. एका खोलगट पातेल्यात थोडे दही घ्यायचे. दह्यात आलं - लसूण पेस्ट तयार करुन घालायची. चमचाभर लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, अगदी थोडी कसुरी मेथी, दोन चमचे बेसन तसेच थोडी जिरे पूड घालायची. धणे पूडही घालायची. व्यवस्थित फेटून घ्यायचे. नंतर त्यात पनीरचा अख्खा तुकडा मॅरिनेट करायचा. 

३. एका पॅनला तेल लावायचे आणि त्यावर पनीर परतून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी खमंग आणि कुरकुरीत परतून घ्यायचे. पॅनला चिकटलेला मसाला काढून पनीरला लावायचा आणि उलथनीच्या मदतीने पनीरचे लांब जाडसर काप करायचे. छान परतून झाल्यावर पनीर काढून घ्यायचे आणि पॅनवर भाज्या परतून घ्यायच्या. त्यात थोडे बेसन घालायचे आणि चमचाभर पाणी थोडे मीठ आणि मसाले घालायचे. छान परतून भाजी तयार करायची. 

४. पॅनमध्ये बटर घ्यायचे आणि तेलही घ्यायचे. त्यावर जिरे परतायचे. हिरवी मिरची परतायची. तसेच बारी चिरलेला कांदा परतून घ्यायचा. त्यात टोमॅटो पेस्ट घालून खमंग परतायची. थोडे लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि मिरी पूड घालायची. थोडे पाणी घालायचे आणि मसाला परतायचा. भाजी तयार झाली की त्यात पनीरचे तुकडे आणि भाज्या घालून एक वाफ काढायची. वरुन बटर आणि थोडी कसुरी मेथी घालायची. 

English
हिंदी सारांश
Web Title : Flavorful Paneer Khurchan: A Must-Try Recipe for a Taste Explosion

Web Summary : Tired of the same old paneer recipes? Try Paneer Khurchan! This flavorful dish is easy to make with readily available ingredients like paneer, yogurt, and spices. Marinate the paneer, sauté it until golden, and combine it with a flavorful tomato-based gravy and vegetables for a delicious culinary experience.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स