Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात 'असा ' खा कांदा, म्हणजे पोट फुगत नाही - गॅस होत नाही! पाहा काय करायचे नेमके..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2025 16:18 IST

Eat onions in winter 'like this', so your stomach doesn't swell, See exactly what to do : पोट फुगणे अपचन काहीही होणार नाही, कांदा खाताना लक्षात ठेवा या गोष्टी.

कांदा हा आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत सामान्य पण आरोग्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेकदा कांद्याला केवळ चव वाढवणारा घटक मानले जाते, पण प्रत्यक्षात कांदा शरीरासाठी पौष्टिक असतो. (Eat onions in winter 'like this', so your stomach doesn't swell, See exactly what to do..)घरगुती उपायांमध्येही कांद्याचा उपयोग आरोग्यवर्धक म्हणून सांगितला आहे.

कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कांद्यात असलेले नैसर्गिक तंतू पोट साफ ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे बद्धकोष्ठता, जडपणा आणि गॅसचा त्रास कमी होतो. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात कांदा असल्यास भूक चांगली लागते आणि अन्न नीट पचते. तसेच कांद्याचे सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास हातभार लागतो. कांदा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतो. त्यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा सामान्य आजारांपासून संरक्षण करतात. हिवाळ्यात किंवा ऋतूबदलाच्या काळात कांदा आहारात असणे फायदेशीर मानले जाते. तसेच कांदा रक्त शुद्धीकरणाचे काम करतो, त्यामुळे त्वचा स्वच्छ व तजेलदार दिसण्यास मदत होते.

कांद्यात अनेक महत्त्वाची पोषणतत्त्वे आढळतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. व्हिटॅमिन B6 मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. कांद्यात पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह ही खनिजेही आढळतात. याशिवाय कांद्यात क्वेर्सेटिन नावाचा अँटी ऑक्सिडंट असतो, जो सूज कमी करण्यास आणि शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतो. तंतुमय घटक असल्यामुळे कांदा वजन नियंत्रणात ठेवण्यासही उपयोगी ठरतो.

कांदा कसा खाल्ला तर तो अधिक फायद्याचा ठरतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कच्चा कांदा खाल्ल्यास त्यातील पोषणतत्त्वे जास्त प्रमाणात मिळतात. जेवणासोबत कच्च्या कांद्याची कोशिंबीर किंवा फोडी खाल्ल्यास पचन सुधारते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. मात्र ज्यांना पोटात जळजळ, आम्लपित्त किंवा गॅसचा त्रास होतो त्यांनी कच्चा कांदा मर्यादित प्रमाणात खावा. अशा वेळी हलका शिजवलेला किंवा परतलेला कांदा पचायला सोपा ठरतो.

कांदा जास्त वेळ जास्त तापमानावर शिजवल्यास त्यातील काही पोषणतत्त्वे कमी होऊ शकतात, त्यामुळे जास्त तेलात तळलेला कांदा टाळलेला बरा. शक्यतो कांदा वाफवून, हलका परतून किंवा कच्च्या स्वरुपात खाल्ला तर त्याचा आरोग्यदायी फायदा अधिक मिळतो. रोज थोड्या प्रमाणात कांदा आहारात असणे शरीरासाठी हितकारक ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat Onions This Way in Winter for Gut Health: Expert Tips

Web Summary : Onions aid digestion, boost immunity, and lower cholesterol. Eat raw for maximum nutrients, but those with acidity should consume it cooked. Avoid deep-frying to retain benefits. Regular, moderate consumption is beneficial for health.
टॅग्स :कांदाहिवाळ्यातला आहारकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न