मक्याची भाकरी हा आपल्या पारंपरिक आहारातील अत्यंत महत्त्वाचा आणि चवदार पदार्थ आहे. आजकाल ही भाकरी फार कमी प्रमाणात खाल्ली जाते. पूर्वी ही भाकरी सातत्याने खाल्ली जायची. विशेषतः हिवाळ्यात मक्याची भाकरी, लोणी, ठेचा किंवा उसळीसोबत खाल्ली की जेवणाची मजा काही औरच असते. (Eat makkedi roti in the winters, if you make it this way it becomes soft and tastes amazing , super healthy ०तसेच जेवल्यावर वेगळीच तृप्ती मिळते. ही भाकरी केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानली जाते.
मक्याची भाकरी करण्यासाठी ताजे आणि बारीक दळलेले मक्याचे पीठ वापरले जाते. पीठ चाळून घेतल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून कोमट पाणी हळूहळू ओतायचे आणि छान भाकरीचे पीठ मळून घ्यायचे. मक्याचे पीठ गव्हासारखे मळता येत नसल्यामुळे ते घट्ट मळण्याऐवजी हाताने दाबत एकत्र करायचे. हे पीठ मऊ आणि एकसंध झाले की त्याचा गोळा करुन ओल्या हाताने भाकरी थापायची. गरम तव्यावर भाकरी सावकाश टाकून दोन्ही बाजूंनी नीट शेकून घ्यायची. भाकरी शेकताना थोडे पाणी शिंपडल्यास ती मऊ राहते आणि आतपर्यंत छान शिजते. साधी भाकरी जशी करता अगदी तशीच करायची. पिठात थोडी हळद किंवा जिरे घातले तर चव आणखी छान लागते.
मक्याची भाकरी छान मऊ आणि चविष्ट होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. मक्याचे पीठ नेहमी ताजे असावे, कारण जुन्या पिठाची भाकरी कडू लागू शकते. पीठ भिजवताना कोमट किंवा गरम पाणी वापरल्यास भाकरी तुटत नाही. भाकरी थापताना हात ओले ठेवले तर पीठ हाताला चिकटत नाही आणि भाकरी नीट आकारात थापता येते. तवा मध्यम तापलेला असावा, फार तापलेला तवा भाकरी जाळतो. भाकरी फार पातळ किंवा फार जाड न करता मध्यम जाडीची केल्यास ती व्यवस्थित शेकली जाते.
आरोग्याच्या दृष्टीने मक्याची भाकरी खूपच लाभदायक आहे. मक्यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. या भाकरीत भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. मक्यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात. जी हाडे मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरतात. मक्याची भाकरी शरीराला उष्णता देणारी असल्यामुळे थंडीच्या दिवसांत ती विशेष फायदेशीर मानली जाते. तसेच गव्हाच्या तुलनेत ग्लुटनचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेकांना ही भाकरी पचायला हलकी जाते.
