Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > काठियावाडी गिरनारी खिचडी खाणार का? इतकी चमचमीत की तोंडाला पाणी सुटेल, काठियावाडी पारंपरिक रेसिपी

काठियावाडी गिरनारी खिचडी खाणार का? इतकी चमचमीत की तोंडाला पाणी सुटेल, काठियावाडी पारंपरिक रेसिपी

Eat Kathiawadi Girnari Khichdi, So delicious traditional recipe, healthy khichdi recipe : नक्की करा काठियावाडी खिचडी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 17:45 IST2026-02-18T17:44:14+5:302026-02-18T17:45:56+5:30

Eat Kathiawadi Girnari Khichdi, So delicious traditional recipe, healthy khichdi recipe : नक्की करा काठियावाडी खिचडी.

Eat Kathiawadi Girnari Khichdi, So delicious traditional recipe, healthy khichdi recipe | काठियावाडी गिरनारी खिचडी खाणार का? इतकी चमचमीत की तोंडाला पाणी सुटेल, काठियावाडी पारंपरिक रेसिपी

काठियावाडी गिरनारी खिचडी खाणार का? इतकी चमचमीत की तोंडाला पाणी सुटेल, काठियावाडी पारंपरिक रेसिपी

खिचडी तर घरोघरी केली जाते. कम्फर्ट फुडच्या यादीत खिचडीचा समावेश आहे. विविध प्रकराच्या खिचडी केल्या जातात. त्यापैकीच एक मस्त प्रकार म्हणजे काठियावाडी गिरनारी खिचडी. (Eat Kathiawadi Girnari Khichdi, So delicious traditional recipe, healthy khichdi recipe )अगदी सोपी आहे मात्र चवीला जबरदस्त. करण्याची पद्धत जरा वेगळी असते. मात्र तुम्हाला आवडेल त्या पदार्थांचा आणि भाज्यांचा वापर करुन करता येते. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य 
तांदूळ, पाणी, मीठ, हळद, मसूर डाळ, मूगडाळ, उडदाची डाळ, तूरडाळ, चणाडाळ, हिरवी मिरची, मटार, फ्लावर, गाजर, फरसबी, सुरण, वांग, शेंगदाणे, लाल तिखट, तूप, जिरं, मोहरी, कडीपत्ता, कांदा, आलं , लसूण , टोमॅटो, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, कोथिंबीर, लिंबू  

कृती
१. एका खोलगट भांड्यात तांदूळ घ्यायचे. त्यात थोडी मसूर डाळ घालायची. थोडी मूगडाळ घालायची. तसेच थोडी चणाडाळ आणि थोडी तूरडाळही घालायची. उडदाची डाळ घालायची आणि नंतर पाणी ओतून स्वच्छ धुवायचे. 

२. मटार सोलून घ्यायचे. फ्लावर चिरुन घ्यायचा. गाजराचे तुकडे करायचे. फरसबीही चिरुन घ्यायची. सुरणाचे काप करायचे. वांग्याचे काप करायचे. टोमॅटो बारीक चिरायचा. इतरही आवडत्या भाज्या घेऊ शकता. सगळ्या भाज्या आवडत्या आकारात चिरुन घ्यायच्या. आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करायची. 

३. एका कुकरमध्ये थोडे तूप घ्यायचे त्यावर सगळ्या भाज्या परतायच्या. नंतर डाळ आणि तांदूळाचे मिश्रण घालायचे आणि मिनिटभर परतायचे. परतून झाल्यावर त्यात मीठ घालायचे. हळद घालायची आणि भरपूर पाणी घालायचे. कारण खिचडी पातळ आणि मऊ व्हायला हवी. कुकर लावायचा आणि खिचडी मस्त शिजवायची. 

४. एका पॅनमध्ये थोडे तूप घ्यायचे. तुपावर मोहरी घालायची आणि छान परतून घ्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घालायचे. तसेच कडीपत्ताही घालायचा. शेंगदाणे घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कांदा घालायचा आणि टोमॅटोही घालायचा. सगळं छान परतून घ्यायचं. मग त्यात धणे पूड तसेच जिरे पूड आणि गरम मसाला घालायचा. छान परतून घ्यायचे. भरपूर लाल तिखट घालायचे. थोडे पाणी घालायचे आणि फोडणी खिचडीत ओतायची. ढवळून मिक्स करायची. वरून लिंबू पिळायचा. गरमागरम खायची.    

Web Title : काठियावाड़ी गिरनारी खिचड़ी: एक स्वादिष्ट, पारंपरिक और आसान आरामदायक भोजन

Web Summary : काठियावाड़ी गिरनारी खिचड़ी, एक स्वादिष्ट आरामदायक भोजन, चावल, दाल और सब्जियों को मिलाती है। सब्जियों को भूनें, चावल और दाल के साथ मिलाएं और प्रेशर कुकर में पकाएं। मसालों के साथ तड़का लगाएं और नींबू के साथ गरमागरम आनंद लें।

Web Title : Kathiawadi Girnari Khichdi: A Delicious, Traditional, and Easy Comfort Food

Web Summary : Kathiawadi Girnari Khichdi, a flavorful comfort food, combines rice, lentils, and vegetables. Sauté vegetables, mix with rice and lentils, and cook in a pressure cooker. Temper with spices and enjoy hot with lemon.