Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात खा गरमागरम 'पनीर घोटाळा' पोटभर, चमचमीत-झणझणीत आणि नवीन रेसिपी

पावसाळ्यात खा गरमागरम 'पनीर घोटाळा' पोटभर, चमचमीत-झणझणीत आणि नवीन रेसिपी

Eat hot 'Paneer Ghotala' during monsoon, sparkling and sizzling, and with a new recipe : पावसाळ्यात पनीरची ही भन्नाट रेसिपी नक्की खा. चवीला मस्त करायला सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 16:40 IST2025-06-06T16:40:00+5:302025-06-06T16:40:48+5:30

Eat hot 'Paneer Ghotala' during monsoon, sparkling and sizzling, and with a new recipe : पावसाळ्यात पनीरची ही भन्नाट रेसिपी नक्की खा. चवीला मस्त करायला सोपी.

Eat hot 'Paneer Ghotala' during monsoon, sparkling and sizzling, and with a new recipe | पावसाळ्यात खा गरमागरम 'पनीर घोटाळा' पोटभर, चमचमीत-झणझणीत आणि नवीन रेसिपी

पावसाळ्यात खा गरमागरम 'पनीर घोटाळा' पोटभर, चमचमीत-झणझणीत आणि नवीन रेसिपी

पनीरच्या आनेक रेसिपी आपण करत असतो. पनीर चवीला छान लागते आणि फार पौष्टिकही असते. पनीरच्या अनेक प्रकारच्या भाज्या करता येतात.(Eat hot 'Paneer Ghotala' during monsoon, sparkling and sizzling, and with a new recipe) मात्र पनीर घोटाळा कधी खाल्ला आहे का? याला पनीर घोटाळा किंवा व्हेज घोटाळा असे म्हणतात. करायला सोपा आहे आणि मस्त चमचमीत पदार्थ आहे.  

साहित्य
पनीर, चीज, बटर, तेल, जिरे, लसूण, आलं, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, हळद, लाल तिखट, पाणी, कोथिंबीर, पावभाजी मसाला, धणे पूड, कसूरी मेथी

कृती
१. पनीर किसून घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच आल्याचा तुकडा घ्यायचा. (Eat hot 'Paneer Ghotala' during monsoon, sparkling and sizzling, and with a new recipe)लसूण आणि आल्याची छान पेस्ट करुन घ्यायची. सिमला मिरची अगदी बारीक चिरायची. कांदा मस्त बारीक चिरायचा. कोथिंबीरीची ताजी जुडी आणा आणि निवडून घ्या. कोथिंबीर मस्त बारीक चिरायची. टोमॅटो पण बारीक चिरायचा. 

२. एका कढईत थोडे बटर घ्यायचे त्यात चमचाभर तेल घालायचे. त्यावर जिरे टाकायचे आणि परतायचे. जिरे मस्त फुलल्यावर त्यात आले व लसणाची पेस्ट घालायची आणि परतून घ्यायची. मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदाही परतायचा. कांदा छान गुलाबी झाल्यावर त्यात सिमला मिरची घालायची. टोमॅटो घालायचा आणि सगळ्या भाज्या छान परतायच्या. भाज्या जरा शिजल्यावर त्यात सुके मसाले घालायचे आणि परतायचे. चमचाभर हळद घालायची. दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला घालायचा. चमचाभर धणे पूड घाला. चमचाभर लाल तिखट घाला आणि चवूनुसार मीठ घाला. त्यात थोडे पाणी घाला पाण्यामुळे मसाले करपणार नाहीत. त्यावर झाकण ठेवा. एक वाफ काढून घ्यायची. 

३. मग त्यातील पाणी जरा आटले आणि भाज्या मऊ झाल्यावर किसलेले पनीर त्यात घालायचे. पनीर छान परतायचे. मग त्यात थोडे पाणी घाला आणि भाजी जरा घट्ट होईपर्यंत परता. मग त्यात चीज किसून घालायचे. वरुन कसूरी मेथी घालायची. हातावर घेऊन जरा चुरायची आणि मग घालायची. थोडे बटर घालायचे आणि मग गॅस बंद करा. बटरवर परतलेल्या पावासेबत खा. भाकरी, चपाती सोबतही खाऊ शकता.        

Web Title: Eat hot 'Paneer Ghotala' during monsoon, sparkling and sizzling, and with a new recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.