'काय बाई हा पावसाळा, थोडंसं खाण्यात इकडे- तिकडे झालं की बिघडलं पोट... ' अशी तक्रार करताना आपण आजवर अनेक जणींना ऐकलं आहे. पण असे असले तरी खाण्याच्या बाबतीतल्या काही सवयी आपण सोडत नाही आणि पर्यायाने मग बऱ्याच जणींना पावसाळ्यात वारंवार पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो.पावसाळा हा अनेक जणांचा अतिशय आवडता ऋतू. आल्हाददायक वातावरण आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ. मंद मंद पाऊस भूरभुरू लागला की, आपसूकच चटकदार पदार्थ खाण्याची ओढ लागते. पाणीपुरी, भेळ, पॅटीस, गरमागरम भजी, पकोडे, मॅगी आणि असेच एकापेक्षा एक टेम्पटिंग पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा होऊ लागते. त्यातही आणखी भर म्हणजे हे सगळे पदार्थ घरी केलेले आपल्याला नको असतात. असे चटकदार पदार्थ खायचे तर गाड्यावरचेच हवे, असा बहुतेकांचा हट्ट असतो. पण मनाने कितीही हट्ट केला तरी, आवर घाला आणि असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. कारण हे पदार्थ खाऊन आपसूकच विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते.
पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:43 IST
पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. यासोबतच सर्दी, खोकला, फुफुसांसंदर्भातले आजार तसेच साथीचे आजार पसरण्याची भिती पावसाळ्यात वाढू लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत काही बंधने पाळणे अतिशय गरजेचे आहे.
पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा.. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !
ठळक मुद्देचटकदार पदार्थ खायचे तर गाड्यावरचेच हवे, असा बहुतेकांचा हट्ट असतो. पण मनाने कितीही हट्ट केला तरी, आवर घाला आणि असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. कारण हे पदार्थ खाऊन आपसूकच विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते.