Methi Benefits in winter : हिवाळा आला की बाजारात हिरव्या भाज्यांची रेलचेल दिसते. त्यातलीच एक पौष्टिक भाजी म्हणजे हिरवी मेथी. मेथी पराठे, आलू-मटर मेथी, मेथी पनीर यांसारखे पदार्थ लोक आवडीने खातात. पण मेथी फक्त चविष्ट नाही, ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीराला आवश्यक अनेक व्हिटामिन्स आणि खनिजे मेथीतून भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे मेथी थंडीच्या दिवसांमध्ये सुपरफूड म्हटली जाते. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात मेथी खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात.
मेथीच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे
1) वजन कमी करण्यात मदत
मेथीत मोठ्या प्रमाणात फाइबर असतं, जे पचन सुधारतं आणि मेटाबॉलिझम बूस्ट करतं. पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे सतत भूक लागत नाही. ओव्हरइटिंग कमी होतं. जर आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मेथी बेस्ट ऑप्शन आहे. नाश्त्यात मेथीचे पराठे किंवा इतर पदार्थ खाल्ल्यास आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही.
2) पचन सुधारतं
मेथीतील फाइबर आंतड्यांची हालचाल सुधारते, त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. मेथीने अॅसिडिटी आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या कमी करण्यातही मदत मिळते. ज्यांना नेहमीच अॅसिडिटी होते त्यांनी आहारात मेथीचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
3) रोगप्रतिकार शक्ती वाढते
हिवाळ्यात शरीराला इन्फेक्शनपासून लढण्यासाठी जास्त क्षमता हवी असते. अशात मेथीत असलेलं व्हिटामिन C आणि इतर पोषक घटक इम्यूनिटी वाढवतात. यामुळे सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
4) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
मेथीमध्ये व्हिटामिन A, व्हिटामिन C, आयर्न, ॲन्टी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ही रक्त शुद्ध करते, त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. तसेच केस मजबूत होतात आणि केसगळती कमी होण्यास मदत होते.
5) डायबिटीजसाठी उपयोगी
मेथीतील फाइबर कार्ब्स आणि साखरेचे शोषण हळू करते, त्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत नाही. काही अभ्यासांनुसार मेथी इन्सुलिन सेंसिटिव्हिटीही सुधारू शकते. म्हणूनच डायबिटीज असलेल्या लोकांसाठी मेथी फायदेशीर ठरते.
6) हृदयासाठी फायदेशीर
मेथी बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यात मदत करते. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि हिवाळ्यात हृदयावरचा ताणही कमी होतो.
मेथी कशी खावी?
मेथीचे पराठे
मेथीची भाजी
मेथी-आलू
मेथी पनीर
जे काही बनवा, पण तेल कमीत कमी वापरा, म्हणजे डिश हेल्दी राहील.
