स्नॅक्ससाठी तेच तेच पदार्थ करुनही कंटाळा येतो आणि खाऊनही. काहीतरी वेगळे करायचे म्हणजे भरपूर साहित्य आणि वेळ हवा. मात्र काही रेसिपी अशाही असतात ज्या झटपट होतात आणि चवीला एकदम भन्नाट असतात. जसे की हे पनीर कबाब. पनीर म्हणा किंवा बेसन सगळ्या पदार्थांची परफेक्ट चव या स्नॅकला असते. करायला अगदी सोपे आहे. लहान मुलांना तर फारच आवडेल. बटाटा न वापरताही असे पदार्थ करता येतात.
साहित्य कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, पनीर, मूगडाळ, ओवा, हळद, जिरे पूड, मीठ, तेल, बेसन, तांदूळ पीठ
कृती१. कांदा सोलून घ्यायचा. तसेच कोथिंबीर निवडून घ्यायची. कांद्याचे तुकडे करायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. पनीरचे तुकडे करायचे. मूगडाळ भिजवायची.
२. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. जाडसर वाटून घ्यायचे. कांदा एकदम बारीक चिरायचा. पनीरही मिक्सरमधून वाटून घ्यायचे. त्याचा लगदा करायचा. एका खोलगट पातेल्यात किंवा परातीत तयार केलेले कोथिंबीरीचे वाटण, तसेच पनीर घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. भिजवलेली मूगडाळ घालायची.
३. त्यात हातावर मळून ओवा घालायचा. तसेच हळद घालायची. थोडी जिरे पूड घालायची. चवीपुरते मीठ घाला आणि थोडे बेसन घालायचे. तांदूळाचे पीठ घालायचे आणि मिश्रण एकजीव करायचे. अगदी घट्ट नाही आणि पातळही नाही. सैलसर असे पीठ तयार करायचे.
४. हाताला तेल लावायचे आणि आवडत्या आकाराचे तुकडे तयार करायचे. पीठ त्या आकारात राहील या पद्धतीत मळा. नंतर कढईत तेल गरम करा. त्यात तयार केलेले तुकडे तळून घ्या. एकदम मस्त कुरकुरीत होतात. आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत असा हा पदार्थ नक्की करुन पाहा. सॉस किंवा चटणीसोबत खा.
Web Summary : Tired of the same old snacks? Try these easy-to-make coriander-paneer kebabs! They're packed with flavor from paneer, herbs, and spices, and are perfect for kids. Enjoy these crispy, soft kebabs with sauce or chutney.
Web Summary : पुराने नाश्ते से ऊब गए हैं? इन आसानी से बनने वाले धनिया-पनीर कबाब को आजमाएं! ये पनीर, जड़ी-बूटियों और मसालों के स्वाद से भरपूर हैं, और बच्चों के लिए बिल्कुल सही हैं। सॉस या चटनी के साथ इन कुरकुरे, नरम कबाबों का आनंद लें।