बटाटा हा पदार्थ लहान - मोठे सगळ्यांनाच आवडतो. त्याची भाजी, आमटी, पराठा, स्नॅक्स असे विविध पदार्थ करता येतात. बटाटा इतरही भाज्यांसोबत छान लागतो. त्यामुळे बटाटा घरोघरी वापरला जातो. बटाट्याचे काहीतरी वेगळे खायची इच्छा असेल तर एकदा ही रेसिपी करा. (Eat a Desi Starter-Chatpate Aloo, Potatoes fried with simple spices, tasty that your mouth will water)चटपटे आलू म्हणजे मसाल्यावर छान परतेला बटाटाच. मात्र जेवढा साधा तेवढाच चमचमीत असा हा पदार्थ आहे. नक्की करा.
साहित्य बटाटा, पाणी, जिरे, धणे - जिरे पूड, मीठ, हळद, गरम मसाला, चाट मसाला, तेल, आलं, लसूण, मोहरी, हिंग, लाल तिखट, पाणी, पांढरे तीळ, कोथिंबीर
कृती१. लहान आकाराचे बटाटे शिजवून घ्यायचे. त्यासाठी पातेल्यात पाणी गरम करायचे आणि त्यात मीठ घालून बटाटे उकळून घ्यायचे. जरा शिजले की गार करायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या. कोथिंबीरीची ताजी जुडी निवडायची स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची.
२. लसूण किसा किंवा बारीक चिरुन घ्या. एका पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि त्यावर बटाटे खमंग परतून घ्या. परतल्यावर काढून गार करत ठेवा. त्यातच आणखी थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर मोहरी घालायची. तसेच जिरेही घालायचे. परतून घ्यायचे. मग बारीक चिरलेला लसूण घाला आणि परतून घ्या. त्यात थोडे हिंग घाला, पांढरे तीळ घाला. खमंग परता आणि गरम मसाला, चाट मसाला, हळद, लाल तिखट, धणे - जिरे पूड घालून जरा काही सेकंद परता. नंतर दोन तीन चमचे पाणी घाला. मसाला छान शिजू द्यायचा.
३. त्यात बटाटे घालायचे. लहान बटाट्यांचे दोन तुकडे करा आणि मोठे असतील तर जास्त तुकडे करा. लहान तुकडे करु नका. मोठेच करा. बटाटे घातल्यावर एक वाफ काढायची आणि मग झाकण काढून बटाटे मस्त परतायचे, मीठ घालायचे. बटाटे जरा खमंग कुरकुरीत परतायचे.
Web Summary : Chatpate Aloo, a simple yet flavorful Indian starter, features potatoes fried with basic spices. Boil, season, and fry potatoes with mustard seeds, ginger, garlic, and spices for a tasty, crispy dish.
Web Summary : चटपटा आलू, एक सरल लेकिन स्वादिष्ट भारतीय स्टार्टर, जिसमें आलू को बुनियादी मसालों के साथ तला जाता है। सरसों के बीज, अदरक, लहसुन और मसालों के साथ आलू उबालें, सीज़न करें और भूनें, एक स्वादिष्ट, कुरकुरी डिश के लिए।