Join us

पोटभर खा मखाणा कोशिंबीर, वजन तर कमी होईलच पण पोटभर खाऊन मनही होईल तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 17:11 IST

Eat a bowl of Makhana salad, you will not only lose weight but also feel satisfied after eating a full bowl. healthy recipe : पोटभर खा ही पौष्टिक रेसिपी. पोटाला आधार आणि वजन होईल कमी. पाहा कसे करायचे.

वजन कमी करण्याचे ठरवले की सगळ्यात कठीण काम असते ते म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवता येणे. (Eat a bowl of Makhana salad, you will not only lose weight but also feel satisfied after eating a full bowl. healthy recipe)जिभेला चमचमीत खायला मिळाले नाही की पोटालाही समाधान मिळत नाही. जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे आरोग्यावर अत्याचार केल्यासारखे आहे. मात्र काही रेसिपी अशा आहेत ज्या चवीलाही छान असतात आणि पौष्टिकही फार असतात. विविध कोशिंबीर आपण खातोच. एकदा ही अशी कोशिंबीर करुन पाहा. नक्की आवडेल.  

साहित्यदही, काकडी, गाजर, कोबी, जिरे पूड, धणे पूड, लाल तिखट, चाट मसाला, सैंधव मीठ, मखाणा

कृती१. मखाणा छान परतून घ्यायचा. तेल तूप काहीही न वापरता परतायचा. छान कुरकुरीत करायचा. गाजर सोलून घ्यायचे आणि मग बारीक किसायचे. बारीक किसलेले गाजर बाजूला ठेवायचे. काकडी सोलायची. काकडी मस्त बारीक किसायची. काकडी किसून झाल्यावर काकडीचे निघालेले पाणी एका खोलगट पातेल्यात घ्यायचे. कोबी बारीक किसायचा. किसलेला नको असेल तर बारीक चिरायचा.  

२. त्या पातेल्यात दही घ्यायचे. दही अगदी मस्त मऊ होईपर्यंत फेटायचे. दही फेटून झाल्यावर त्यात सैंधव मीठ घालायचे. तसेच जिरे पूड घालायची चमचाभर धणे पूड घालायची आणि पुन्हा दही एकजीव करायचे. सगळे मसाले दह्यात मिसळे पाहिजेत. 

३. त्या दह्यात किसलेली काकडी घालायची. काकडी किसायची नसेल तर बारीक तुकडे करुन घालू शकता. किसलेले गाजर घालायचे. किसलेला कोबी घालायचा. परतलेले मखाणे घालायचे.  सगळे पदार्थ व्यवस्थित ढवळायचे. दही आणि भाज्या एकजीव झाल्यावर त्यात चमचाभर चाट मसाला घालायचा. ढवळायचे आणि फ्रिजमध्ये गार करत ठेवायचे. गार खायचे नसेल तर तसेच खाऊ शकता. मात्र गार जास्त चविष्ट लागते.      

तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या आणि इतर पदार्थ त्यात घालू शकता. जसे की टोमॅटो आहे, मक्याचे दाणे छान लागतात. छान उकडून घालायचे. पनीर घाला कोशिंबीर आणखी पौष्टिक होईल. सोयाबिनही घालू शकता. इतरही भाज्या घालू शकता. नक्की खाऊन पाहा.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आहार योजना