आजही अनेक घरांमध्ये साजूक तूप विकत न आणता घरच्याघरीच तयार केले जाते. परंतु साजूक तूप तयार करणे म्हणजे वाटते तितके सोपे काम नाही. तूप तयार करण्याची (Easy Tricks To Clean Burnt Ghee While Making) ही प्रक्रिया फारच किचकट आणि वेळखाऊ असते. इतकेच नाही तर साजूक तूप तयार करताना साय साठवण्यापासून तूप तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टींची अगदी (Homemade tricks to remove burnt smell from ghee) बारकाईने काळजी घ्यावी लागते. अनेकदा तूप कढवताना थोडा वेळ ( Easy Tricks To Clean Burnt Ghee) जास्त झाला की ते करपते आणि त्याचा रंग गडद किंवा काळपट होतो. जर साजूक तूप तयार करताना ते चुकून करपले तर त्याचा रंग आणि चव दोन्ही बिघडते. अशा करपलेल्या साजूक तुपाचा उपयोगही मर्यादित होतो(How to clean overcooked ghee easily).
अशा परिस्थितीत, करपलेल्या तुपाचा उपयोग करावा की नाही, हा प्रश्न अनेक गृहिणींना सतावतो. काहीवेळा तर आपण हे साजूक तूप काहीच उपयोगाचे नाही असे समजून चक्क फेकून देतो. गडद आणि काळपट रंगाचे करपलेले साजूक तूप फेकून न देता आपण घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या २ पदार्थांच्या मदतीने त्याची बिघडलेली चव आणि रंग देखील सुधारु शकतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने करपलेल्या तुपाचा काळा रंग आणि करपट वास दूर करता येतो आणि ते पुन्हा वापरण्यायोग्य करता येते. या साध्यासोप्या घरगुती उपायांनी तूप वाया जाणार नाही आणि त्याचा मूळ गंध आणि रंगही परत मिळवता येतो. करपलेल्या साजूक तुपाचा रंग आणि चव पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी कोणते २ पदार्थ उपयुक्त आहेत ते पाहूयात.
साजूक तूप करपल्याने जर त्याचा रंग व चवीत बदल झाला असेल तर, काही घरगुती ट्रिक्सच्या मदतीने तो रंग व चव सहज ठीक करू शकता. यासाठी फारसे श्रम लागत नाहीत आणि तूप पुन्हा वापरण्यायोग्य होतं. यासाठी आपल्याला कपभर मखाणे व एक कच्चा बटाटा इतक्या २ पदार्थांची गरज लागणार आहे.
तूप रवाळ व दाणेदार होणारच! तूप करताना लक्षात ठेवा ५ पारंपरिक खास टिप्स...
१ कच्चा बटाटा :- सर्वातआधी करपलेलं साजूक तूप एखाद्या स्वच्छ भांड्यात गाळून घ्या. आता हे तूप पुन्हा एकदा गॅसवर हलकंसं गरम करा.
त्यानंतर एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याची साले काढा. बटाट्याचे मोठे आणि थोडेसे लांबसर तुकडे करा व हे तुकडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. धुतलेले सर्व बटाट्याचे तुकडे गरम तुपामध्ये घाला. आता गॅसची फ्लेम कमी ठेवून तूप हलवत राहा. थोड्या वेळात तुम्ही पाहू की तुपातून येणारा वास आणि काळपटपणा हळूहळू कमी होत जाईल.
दक्षिण भारतात घरोघर करतात तसा सांबार राईस करण्याची पाहा सोपी रेसिपी, मस्त आंबटगोड चविष्ट पदार्थ...
२. मखाणे :- करपलेले साजूक तूप एका गाळणीतून किंवा स्वच्छ कापडाने गाळून घ्या. आता हे तूप एका नवीन भांड्यात ओतून गॅसवर हलकं गरम करायला ठेवा. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुमारे ८ ते १० मखाणे घालावेत. हे मखाणे तुपात घालवून हलवत राहा, त्यामुळे तुपाचा जळका वास कमी होते आणि रंगही पुन्हा पहिल्यासारखा होण्यास मदत होते.