भारतात घरोघरी आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा किंवा स्नॅक्सचा एक प्रकार म्हणजे चिवडा. विविध प्रकारचे चिवडे केले जातात. त्यापैकी एक म्हणजे हा मुरमुऱ्यांचा चिवडा. मुरमुर्याचा चिवडा घरोघरी केला जातोच. पचायला हलका असतो आणि करायलाही सोपा असतो. या चिवड्यात अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक म्हणजे लसूण चिवडा. मसालेदार आणि चविष्ट असा हा चिवडा एकदा केला की महिनाभर सहज टिकतो. (Easy to digest and delicious in taste, Murmura garlic masala chiwda is a delicious snack that lasts for months.)हवाबंद डब्यात ठेवला ही छान कुरकुरीतही राहतो. त्यामुळे हा पदार्थ नक्की करुन पाहा. करायला जास्त वेळही लागत नाही. तसेच साहित्यही मोजकेच लागते. पाहा चिवडा करायची सोपी रेसिपी.
साहित्य
मुरमुरे, शेंगदाणे, डाळं, जाड शेव, लसूण, हिरवी मिरची, कडीपत्ता, तेल, लाल तिखट, मीठ, हिंग, हळद
कृती
१. मुरमुरे तव्यावर भाजून घ्यायचे. एका कढईत तेल घ्यायचे. तेल छान गरम करायचे आणि मग त्यात शेंगदाणे तळून घ्यायचे. कडीपत्याची ताजी पाने तळून घ्यायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. ते ही छान तळून घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. भरपूर लसूण घ्या. लसूण ठेचायचा. ठेचल्यावर छान तळून घ्यायचा. डाळंही तळून घ्यायचे. छान कुरकुरीत तळायचे.
२. एका परातीत भाजलेले मुरमुरे घ्यायचे. त्यात तळलेले शेंगदाणे घालायचे. तसेच तळलेले डाळे घालायचे. जाडसर अशी पिवळी शेव घालायची. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. नंतर कडीपत्ताही घालायचा. तसेच लसूण घालायचा. सगळे पदा४थ गार झाल्यावर एकदम कुरकुरीत होतात.
३. एका फोडणीपात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल छान गरम करायचे, गॅस बंद करायचा आणि नंतर त्यात चमचाभर मीठ घालायचे. तसेच थोडे हिंग घाला. चमचाभर हळद घाला आणि दोन ते तीन चमचे लाल तिखट घाला. चमच्याने ढवळा आणि चिवड्यावर ओता. चिवडा मस्त ढवळा आणि एकजीव करुन घ्या. मस्त कुरकुरीत होतो आणि एकदम चविष्ट लागतो. नक्की करुन पाहा.
