Join us

फक्त १ कच्चा बटाटा वापरून करा खमंग, कुरकुरीत नाश्ता; झटपट, कमी साहित्यात बनेल स्नॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:41 IST

Easy Snacks Recipe : आजकाल इस्टंट तयार होणारे पदार्थच सगळ्यांना हवे असतात. (Potato Snacks) 

नाश्त्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की नवीन काय करावं सुचत नाही. पोहे, डोसा उपमा ब्रेड कटलेट याशिवाय  काहीतरी वेगळं काही खायची इच्छा होतेच. (Cooking Tips) पण काहीही बनवायचं म्हटलं की वेळ जातो आजकाल इस्टंट तयार होणारे पदार्थच सगळ्यांना हवे असतात. (Potato Snacks) 

बटाटा सर्वांच्याच स्वयंपाकघरात असतोच फक्त एका बटाट्याचा वापर करून तुम्ही कुरकुरीत खमंग नाश्ता बनवू शकता.  हा पदार्थ करायला सोपा आणि खायला कुरकुरीत असल्यानं घरातल्या लहांनांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. (How to make snacks from potato)

सगळ्यात आधी एक बटाटा किसून घ्या.  स्वच्छ पाण्यानं हा किस धुवा. एका कढईत तेल घालून त्यात जीरं, मिरची आणि पांढरे तिळ घाला. एक परतून घेतल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ  घाला. पाणी घालून एक उकळ काढा. त्यात बटाट्याचा किस आणि रवा घाला. हे मिश्रण एकत्र करा आणि घट्ट झाल्यानंतर एका प्लेटला तेल लावून मिश्रण पसरवा. हे मिश्रण थोडं गार झाल्यानंतर त्याचे त्रिकोणी काप करून घ्या. नंतर तेल गरम करून हे काप तळून घ्या. तयार आहे गरमागरम बटाट्याचे स्नॅक्स

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न