दाबेली हा भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. गल्लोगल्ली दाबेलीचे स्टॉल दिसतात. चवीला मस्त असते आणि कमी खर्चात पोटही भरते. घरी केलेली दाबेली जास्त चविष्ट आणि हायजेनिक ठरते. दाबेलीतही काही प्रकार असतात. (Easy recipe to make dabeli maasala at home in just 5 minutes, cheese dabeli recipe )त्यापैकी एक लोकप्रिय म्हणजे चीज दाबेली. करायला अगदी सोपी आहे. मसालाही घरीच करा, पाहा कशी कराल.
साहित्य पाव, बटाटा, चीज, दालचिनी, दगड फुल, वेलची, लवंग, सुकी लाल मिरची, बडीशेप, धणे, सुकं खोबरं, तेल, हळद, जिरे पूड, लाल तिखट, मीठ, साखर, चिंच, पाणी, कांदा, कोथिंबीर, डाळिंब, शेव, शेंगदाणे, बटर
२. एका कुकरमध्ये पाणी आणि बटाटे घ्यायचे आणि उकडायचे. मस्त मऊ शिजवायचे. गार झाल्यावर सालं काढून बटाटे व्यवस्थित कुस्करुन घ्यायचे. वाटीत चिंच गरम पाण्यात भिजवायची. कुस्करुन घ्यायची आणि बिया काढून टाकायच्या. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि सालं काढून टाकायची. चिंचेची चटणी तयार करायची. आणि मिरची, कोथिंबीर मीठ अशी एक चटणी तयार करायची.
३. पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल जास्त घ्यायचे जरा, त्यात थोडे बटर घालायचे. त्यात हळद घाला. लाल तिखट घाला. तयार केलेला दाबेली मसाला घाला. चिंचेचा कोळ घाला. शेंगदाणे घाला, थोडी साखर घाला आणि मीठ घाला. थोडे पाणी घाला. जास्त नको अगदी थोडेच. ढवळून घ्या आणि एक वाफ काढा.
४. कांदा बारीक चिरायचा. कोथिंबीरही बारीक चिरायची. चीज किसून घ्यायचे. पावाला भाजी लावायची त्यात किसलेले चीज भरायचे. शेव आणि कांदा घालायचा. डाळिंब्याचे दाणे घालायचे. तव्यावर बटर घालायचे आणि त्यावर दाबेली दोन्ही बाजूनी परतून घ्यायची. नंतर शेवेत घोळवायची, शेंगदाणे लावायचे आणि कांदाही लावायचा. मस्त गरमागरम खा.
Web Summary : Make delicious cheese dabeli at home! This easy recipe includes preparing the masala, potato mixture, and assembling the dabeli with cheese, onions, and pomegranate seeds. Fry in butter, coat with sev, and enjoy!
Web Summary : घर पर स्वादिष्ट चीज़ दाबेली बनाएं! इस आसान रेसिपी में मसाला, आलू मिश्रण तैयार करना और चीज़, प्याज और अनार के दानों के साथ दाबेली को असेंबल करना शामिल है। मक्खन में भूनें, सेव से कोट करें और आनंद लें!