Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > दाबेली मसाला विकत न आणता घरीच फक्त ५ मिनिटांत चीज दाबेली करण्याची सोपी रेसिपी, आंबटगोडतिखट चव

दाबेली मसाला विकत न आणता घरीच फक्त ५ मिनिटांत चीज दाबेली करण्याची सोपी रेसिपी, आंबटगोडतिखट चव

Easy recipe to make dabeli maasala at home in just 5 minutes, cheese dabeli recipe : चविष्ट चीज दाबेली रेसिपी करण्याची रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 18:15 IST2026-02-05T18:12:21+5:302026-02-05T18:15:17+5:30

Easy recipe to make dabeli maasala at home in just 5 minutes, cheese dabeli recipe : चविष्ट चीज दाबेली रेसिपी करण्याची रेसिपी.

Easy recipe to make dabeli maasala at home in just 5 minutes, cheese dabeli recipe | दाबेली मसाला विकत न आणता घरीच फक्त ५ मिनिटांत चीज दाबेली करण्याची सोपी रेसिपी, आंबटगोडतिखट चव

दाबेली मसाला विकत न आणता घरीच फक्त ५ मिनिटांत चीज दाबेली करण्याची सोपी रेसिपी, आंबटगोडतिखट चव

दाबेली हा भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. गल्लोगल्ली दाबेलीचे स्टॉल दिसतात. चवीला मस्त असते आणि कमी खर्चात पोटही भरते. घरी केलेली दाबेली जास्त चविष्ट आणि हायजेनिक ठरते. दाबेलीतही काही प्रकार असतात. (Easy recipe to make dabeli maasala at home in just 5 minutes, cheese dabeli recipe )त्यापैकी एक लोकप्रिय म्हणजे चीज दाबेली. करायला अगदी सोपी आहे. मसालाही घरीच करा, पाहा कशी कराल.  

साहित्य 
पाव, बटाटा, चीज, दालचिनी, दगड फुल, वेलची, लवंग, सुकी लाल मिरची, बडीशेप, धणे, सुकं खोबरं, तेल, हळद, जिरे पूड, लाल तिखट, मीठ, साखर, चिंच, पाणी, कांदा, कोथिंबीर, डाळिंब, शेव,  शेंगदाणे, बटर


 
कृती
१. एका पॅनमध्ये चमचाभर बडीशेप घ्यायची. त्यात चमचाभर जिरे घालायचे. दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं, लहानशी सुकी लाल मिरची,दोन चमचे धणे घालायचे. त्यात दालचिनीचा लहान तुकडा. दगड फुल आणि दोन लवंगा घालायच्या. मसाला मंद आचेवर भाजून घ्यायचा. भाजून झाल्यावर मसाला गार करुन घ्यायचा. गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यायचा. 

२. एका कुकरमध्ये पाणी आणि बटाटे घ्यायचे आणि उकडायचे. मस्त मऊ शिजवायचे. गार झाल्यावर सालं काढून बटाटे व्यवस्थित कुस्करुन घ्यायचे. वाटीत चिंच गरम पाण्यात भिजवायची. कुस्करुन घ्यायची आणि बिया काढून टाकायच्या. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि सालं काढून टाकायची. चिंचेची चटणी तयार करायची. आणि मिरची, कोथिंबीर मीठ अशी एक चटणी तयार करायची.    

३. पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल जास्त घ्यायचे जरा, त्यात थोडे बटर घालायचे. त्यात हळद घाला. लाल तिखट घाला. तयार केलेला दाबेली मसाला घाला. चिंचेचा कोळ घाला. शेंगदाणे घाला, थोडी साखर घाला आणि मीठ घाला. थोडे पाणी घाला. जास्त नको अगदी थोडेच. ढवळून घ्या आणि एक वाफ काढा. 

४. कांदा बारीक चिरायचा. कोथिंबीरही बारीक चिरायची. चीज किसून घ्यायचे. पावाला भाजी लावायची त्यात किसलेले चीज भरायचे. शेव आणि कांदा घालायचा. डाळिंब्याचे दाणे घालायचे. तव्यावर बटर घालायचे आणि त्यावर दाबेली दोन्ही बाजूनी परतून घ्यायची. नंतर शेवेत घोळवायची, शेंगदाणे लावायचे आणि कांदाही लावायचा. मस्त गरमागरम खा.    

Web Title : 5 मिनट में घर पर बनाएं चीज़ दाबेली: आसान, मीठा, खट्टा, तीखा स्वाद

Web Summary : घर पर स्वादिष्ट चीज़ दाबेली बनाएं! इस आसान रेसिपी में मसाला, आलू मिश्रण तैयार करना और चीज़, प्याज और अनार के दानों के साथ दाबेली को असेंबल करना शामिल है। मक्खन में भूनें, सेव से कोट करें और आनंद लें!

Web Title : Easy Homemade Cheese Dabeli Recipe in 5 Minutes: Sweet, Sour, Spicy

Web Summary : Make delicious cheese dabeli at home! This easy recipe includes preparing the masala, potato mixture, and assembling the dabeli with cheese, onions, and pomegranate seeds. Fry in butter, coat with sev, and enjoy!