दिवाळीच्या दिवसांत मिठाया मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. पण विकतच्या मिठाया भेसळयुक्त असू शकतात. घरी गोड पदार्थ करणं खूपच किचकट वाटतं. युट्यूबर पुनम देवनानी यांनी गॅस न जाळता फक्त १० मिनिटांत काजूकतली कशी करायची याची सोपी रेसिपी सांगितली आहे (How To Make Kaju Katli). ही रेसिपी अशा लोकांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांच्याकडे वेळ कमी आहे. जर तुम्हाला भेसळयुक्त काजू कतली दुकानातून खरेदी करायची नसेल तर घरच्याघरी काजूकतली कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया. (Diwali Special Kaju Katli Recipe)
काजू कतली करण्यासाठी लागणारं साहित्य
एक कप -साखर, जवळपास २५० ग्राम
१२ ते १३- काजू
३ ते ४- वेलची
एक कप -मिल्क पावडर
एक कप -फुटाणे
३ चमचे- तूप
काजू कतली करण्याची सोपी रेसिपी
सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात साखर, काजू, वेलची पावडर घालून बारीक दळून घ्या. व्यवस्थित चाळून घ्या. नंतर याची जाडसर पावडर वेगळी करा.फुटाणे म्हणजेच भाजलेले चणे जे डाळी प्रमाणे दिसातत ते मिक्सर जारमध्ये घालून काजू, साखर यांची पावडर घालून व्यवस्थित वाटून घ्या. ही पावडर तुम्ही गाळून घेऊ शकता.
नंतर पाक तायर करण्यासाठी तुम्हाला तासनतास घालवण्याची काही गरज नाही. वेळ आणि मेहनत दोन्हींची बचत होईल या पद्धतीनं पाक तयार करा. काजू, साखर आणि फुटाण्याची पावडर एका वाटीत मिसळून त्यात एक कप मिल्क पावडर आणि ३ चमचे तूप मिसळा.
पावडरमध्ये थोडं थोडं करून दूध घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या. दूधाचं प्रमाण कमी असायला हवं. हे मिश्रण एकत्र करून यात पुन्हा थोडं दूध मिसळा. मिल्क पावडर, तूप आणि दूध हे मिश्रण तयार झाल्यानंतर पारंपारीक माव्यासारखं टेक्स्चर येईल.
काजू कतलीची खासियत अशी की एकसारखी आणि पतंगाच्या आकारात असते. असा आकार देण्यासाठी पोळपाटावर पसरवून लाटून घ्या. लाटण्याच्या मदतीनं काजू कतली एकसारखी लाटा. सुरीऐवजी पट्टीचा वापर केला तर व्यवस्थित लूक येईल. ही छोटी ट्रिक वापरून तुम्ही घरच्याघरी काजू कतली बनवू शकता. काजू कतली कापण्याआधी वर चांदीचा वर्ख लावा. ज्यामुळे अधिकच सुंदर दिसेल. तयार आहे स्वादीष्ट काजूकतली.