Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरमागरम कढीचा मारा भुरका !! पांढरी कढी करण्याची सोपी रेसिपी, विविध चवींचे कॉम्बिनेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 18:56 IST

Easy recipe for making white kadhi, combination of different flavors : चविष्ट पांढरी कढी करण्याची सोपी रेसिपी.

काही पदार्थ जेवढे साधे तेवढेच चविष्ट असतात. असाच एक पदार्थ म्हणजे कढी. कढी हा पदार्थ फक्त पोटभरीचा किंवा चविष्ट नसतो तर कढी मनाला शांतता देते. समाधान देते. पोटाला आराम मिळतो आणि जिभेला चवही मिळते. कढी करण्याची पद्धत घरोघरी वेगळीच. ( Easy recipe for making white kadhi, combination of different flavors)पिवळी कढी महाराष्ट्रात फार आवडीने केली जाते. त्याच प्रकारे मस्त अशी पांढरी कढीही करता येते. फक्त हळद  घालायची नाही असे नसून त्याची रेसिपी थोडी वेगळी असते.   

साहित्य जिरं, तूप, दही, लसूण, आलं, हिरवी मिरची, मीठ, सुकी लाल मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, बेसन, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळिमीरी, साखर, जिरे  

कृती१. चमचाभर जिरं, हिरव्या मिरचीचे तुकडे एका कुटणीत घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि त्यात घालायच्या. तसेच आल्याचा तुकडाही घ्यायचा. सगळं छान कुटून घ्यायचं. त्याची मस्त पेस्ट तयार करायची. मिक्सरमधून वाटले तरी चालेल किंवा जाडसर ठेचले तरी चालेल. सुकी मिरचीही जरा ठेचून घ्यायची. 

२. खोलगट पातेल्यात दही घ्यायचे. त्यात चमचाभर बेसन घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळं मिक्स करायचं आणि त्यात पाणी घालून छान ढवळून घ्यायचे. चमचाभर साखरही घाला. 

३. पातेल्यात तूप गरम करायचे. तूप छान गरम झाल्यावर त्यात लवंग घालायची. दालचिनीचा तुकडा घालायचा. तसेच काळिमीरी घालायची आणि कडीपत्ता घालायचा. परतून घ्यायचे. सुकी मिरची परतायची. तमालपत्र घालायचे आणि परतून घ्यायचे. नंतर तयार केलेली लसणाच्या पेस्ट घालायची आणि मस्त परतून घ्यायची. त्यात दह्याचे मिश्रण ओतायचे आणि छान मिक्स करायचे.    

४. प्रमाणानुसार पाणी घालून कढी ढवळत रहायची. छान उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचे. मस्त गरमागरम प्या, भातासोबत खा. चवीला जरा वेगळी मात्र मस्त असते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Simple White Kadhi Recipe: A Delicious and Soothing Culinary Experience

Web Summary : White Kadhi offers a comforting, flavorful experience. This recipe details the simple steps to create this unique dish, blending spices and yogurt for a delicious, soothing meal. Enjoy it hot!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स