Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हेल्दी कॅण्डी करायची सोपी रेसिपी - वापरा फक्त ३ पदार्थ , लहान मुलांनाही नक्की आवडेल, विकतचे चॉकलेट विसरुन जातील

हेल्दी कॅण्डी करायची सोपी रेसिपी - वापरा फक्त ३ पदार्थ , लहान मुलांनाही नक्की आवडेल, विकतचे चॉकलेट विसरुन जातील

Easy recipe for making healthy candy - use only 3 ingredients, even children will definitely like it : आरोग्यासाठी फायद्याची ठरते ही कॅण्डी नक्की करा आणि पोटभर खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2025 17:35 IST2025-12-19T17:31:42+5:302025-12-19T17:35:34+5:30

Easy recipe for making healthy candy - use only 3 ingredients, even children will definitely like it : आरोग्यासाठी फायद्याची ठरते ही कॅण्डी नक्की करा आणि पोटभर खा.

Easy recipe for making healthy candy - use only 3 ingredients, even children will definitely like it | हेल्दी कॅण्डी करायची सोपी रेसिपी - वापरा फक्त ३ पदार्थ , लहान मुलांनाही नक्की आवडेल, विकतचे चॉकलेट विसरुन जातील

हेल्दी कॅण्डी करायची सोपी रेसिपी - वापरा फक्त ३ पदार्थ , लहान मुलांनाही नक्की आवडेल, विकतचे चॉकलेट विसरुन जातील

केस गळणे, त्वचा खराब होणे या सगळ्या त्रासांवर आपण उपाय करत असतो. काही उपाय फायद्याचे ठरतात तर काही नाही. केसांसाठी आणि त्वचेसाठी काही पदार्थ फार उपयुक्त असतात त्यापैकी तीन पदार्थ म्हणजे आवळा, गाजर आणि बीट. त्यांचा आहारात समावेश असावा. (Easy recipe for making healthy candy - use only 3 ingredients, even children will definitely like it, they will forget about the purchased chocolate)पण जर या तिन्हींचा एकत्र छान असा पदार्थ करता आला तर ? आरोग्यासाठी चांगली आणि लहान मुलेही आवडीने खातील अशी कॅण्डी घरी करणे अगदी सोपे. त्यात आवळा, बीट आणि गाजराचे गुणधर्म असतात. करायला अगदी सोपी असलेली ही कॅण्डी नक्की करुन पाहा. 

साहित्य 
आवळा, बीट, गाजर, गूळ, तूप, मीठ, लिंबू, कॉर्नफ्लावर, पाणी, पिठीसाखर

कृती
१. काही आवळे थोडे बीट आणि गाजर वाफवून घ्यायचे. गाजर आणि बीटाचे तुकडे करायचे. प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठरवा. बीट जरा जास्त घ्या म्हणजे चव छान येते. दहा मिनिटे वाफवायचे. वाफवून झाल्यावर गार करायचे. मग आवळ्याच्या बिया काढून घ्यायच्या. एका मिक्सरच्या भांड्यात आवळा, गाजर आणि बीट घ्यायचे. त्यात गूळ घालायचा. किसून किंवा चिरुन  घ्यायचा. गूळ पावडर वापरली तर जास्त चांगले ठरेल. मिक्सरमधून वाटून घ्यायचे. 

२. एका पॅनमध्ये तयार केलेली पेस्ट घ्यायची. मंद आचेवर परतायचे. त्यात चमचाभर तूप घालायचे. तसेच थोडे मीठ घालायचे. तसेच लिंबाचा रस घालायचा. ढवळत राहायचे. नंतर त्याच थोडा लिंबाचा रस घालायचा. एका वाटीत अगदी चमचाभर कॉर्नफ्लावर घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि ढवळायचे. मस्त मिक्स करायचे. दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर मिश्रणात घालायचे. चमचाभर लिंबाचा रस घालायचा. ढवळायचे आणि जरा आटवून घ्यायचे. 

३. मिश्रण घट्ट झाल्यावर जरा गार होऊ द्यायचे. मग त्याचे लहान गोळे तयार करायचे. एका ताटात पिठीसाखर पसरवायची. त्यात हे गोळे घोळायचे. हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे. दोन ते तीन महिने आरामात टिकतात. चवीलाही एकदम मस्त लागतात.  

Web Title : आसान हेल्दी कैंडी रेसिपी: आंवला, चुकंदर, गाजर - बच्चे प्यार करेंगे!

Web Summary : आंवला, चुकंदर और गाजर का उपयोग करके घर पर हेल्दी कैंडी बनाएं। यह सरल रेसिपी पोषक तत्वों से भरपूर है और स्वादिष्ट है। बच्चे दुकानों से खरीदी चॉकलेट भूल जाएंगे!

Web Title : Easy healthy candy recipe: Amla, beetroot, carrot – kids will love!

Web Summary : Make healthy candy at home using amla, beetroot, and carrot. This simple recipe is packed with nutrients and tastes delicious. Kids will forget store-bought chocolates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.