Lokmat Sakhi >Food > कोणत्याही भांड्यात करता येतो असा Banana Cake करायची सोपी रेसिपी - लहान मुलांना हमखास आवडेल

कोणत्याही भांड्यात करता येतो असा Banana Cake करायची सोपी रेसिपी - लहान मुलांना हमखास आवडेल

Easy recipe for making Banana Cake, kids will definitely love it, must try it : बनाना केक करायची एकदम सोपी रेसिपी. पाहा कसा करायचा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 17:46 IST2025-09-22T17:44:16+5:302025-09-22T17:46:21+5:30

Easy recipe for making Banana Cake, kids will definitely love it, must try it : बनाना केक करायची एकदम सोपी रेसिपी. पाहा कसा करायचा.

Easy recipe for making Banana Cake, kids will definitely love it, must try it | कोणत्याही भांड्यात करता येतो असा Banana Cake करायची सोपी रेसिपी - लहान मुलांना हमखास आवडेल

कोणत्याही भांड्यात करता येतो असा Banana Cake करायची सोपी रेसिपी - लहान मुलांना हमखास आवडेल

घरी केक करण्यासाठी ओव्हन हवाच असे काही नाही. कुकरमध्ये किंवा कोणत्याही भांड्यात केक तयार करता येतो. अगदी सोपी रेसिपी असते. विविध प्रकारचे केक घरी करता येतात. (Easy recipe for making Banana Cake, kids will definitely love it, must try it )त्यापैकीच एक प्रकार म्हणजे हा केळीचा केक. चवीला एकदम मस्त असतो. तसेच करायला सोपा आहे. लहान मुलांना प्रचंड आवडेल. एकदा नक्की करुन पाहा. साखरेऐवजी गूळ वापरु शकता. तसेच मधही वापरु शकता.  

साहित्य 
केळी, दूध, साखर, तूप, रवा, बेकींग सोडा, बेकींग पावडर 

कृती
१. दोन केळी घ्यायची. सोलून घ्या आणि मग त्याचे तुकडे करुन मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्याची मस्त पेस्ट तयार करायची.  नंतर दोन कळी घेतल्यावर त्यानुसार अंदाज घातल्यावर, वाटीभर साखर घ्यायची. अर्धी वाटी रवा घ्यायचा. आणि त्यात दोन ते तीन चमचे तूप घालायचे. वाटीभर दूध घ्यायचे. हे मिश्रणही मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटून घ्यायचे. 

२. एका खोलगट पातेल्यात केळीची पेस्ट घ्यायची. त्यात तयार मिश्रण घालायचे आणि एकजीव करायचे. व्यवस्थित ढवळून घ्यायचे. मिश्रण छान एकत्र केल्यावर त्यात चमचाभर बेकींग सोडा घाला. तसेच चमचाभर बेकींग पावडरही घाला. व्यवस्थित ढवळून घ्यायचे.  एका गोलाकार पातेल्यात केक करा किंवा तुम्हाला जे पातलं वापरायचं ते वापरु शकता. फक्त त्यातून केक सुटेल याची काळजी घ्या. 

३. पातेल्याला तूप लावायचे. तूप लावल्यावर तयार केलेले केकचे मिश्रण त्यात ओतायचे. पातलं आपटून सेट करुन घ्यायचे. एका कुकरमध्ये मीठ घालायचे. कुकर पूर्ण सुका असायला हवा. मिठात एक खोलगट ताटली उलटी करुन ठेवायची. त्यावर केकचे पातेले ठेवायचे. गॅस मंद आचेवर ठेवायचा. झाकण उलटे लावायचे. शिटी काढायची नाही. कुकर हवाच असे काही नाही साध्या कढईतही करु शकता. तसेच इडली पात्रातही करता येते. 

४. ४० मिनिटांत केक नक्की तयार होईल. सुरीच्या मदतीने केक झाला की नाही तपासायचे. मस्त मऊ आणि स्वादिष्ट लागतो. गार झाल्यावर पलटी मारुन केक काढून घ्यायचा. गरम असताना काढायची घाई करु नका. केक तुटण्याची शक्यता असते. 
 

Web Title: Easy recipe for making Banana Cake, kids will definitely love it, must try it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.