Join us

Easy Pithla Recipe : थंडीत भाकरीबरोबर खा झणझणीत-चवदार पिठलं; अस्सल गावरान चवीची रेसेपी, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:53 IST

Easy Pithla Recipe : रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणाला तुम्ही हे मेन्यू ट्राय करू शकता. (How to make pithla)

थंडीत बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पिठलं खाण्याची मजाच काही वेगळी. पिठलं भाकरी खायला  चविष्ट, रुचकर आणि करायला अगदी सोपा असा मेन्यू आहे. पिठलं बनवण्याचे अनेक प्रकार आहेत.  कोणी लाल तिखट घालून तर कोणी हिरव्या मिरच्या घालून पिठलं बनवतं. (Maharashtrian Pithla Recipe) या लेखात अस्सल गावरान चवीचं पीठलं बनण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया.  रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणाला तुम्ही हे मेन्यू ट्राय करू शकता. (How to make pithla)

साहित्य

२ चमचे तेल

१/२ टीस्पून मोहरी

१/२ टीस्पून जिरे

१/२  टीस्पून राई

चिमूटभर हिंग

८ ते १० कढीपत्ता

१ कप बारीक चिरलेला कांदा

१ कप बेसन

2 कप पाणी किंवा अधिक

१५ ते २० लसूण पाकळ्या

7-8 हिरव्या मिरच्यां वाटलेल्या

1/4 टीस्पून हळद पावडर

१/४ टीस्पून गरम मसाला

चवीनुसार मीठ

बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

१) सगळ्यात  आधी तेल गरम करून घ्या त्यात हिंग, जिरे,  बडीशेप, मोहरी घाला. नंतर कढीपत्ता लसूण हिरवी मिरची आणि हळद घाला, 1 मिनिट शिजवा, कांदे घाला, 2-3 मिनिटे शिजवा.

घरच्याघरी फक्त १० रुपये खर्च करुन बनवा कसुरी मेथी; वर्षभर टिकेल, बघा कशी करायची..

२) कांद्याचं मिश्रण शिजल्यानंतर बेसन आणि पाण्याचे मिश्रण घाला. बेसनचा वास येईपर्यंत 10-12 मिनिटे शिजवा. नंतर मीठ आणि गरम मसाला घालून आणखी २ मिनिटे शिजवा आणि सर्व्ह करा. जर तुम्हाला ते पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता.  लसूण आणि हिरवी मिरची फोडणीऐवजी तुम्ही थेचा किंवा लाल तिखट देखील वापरू शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न