आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या बाप्पाचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आता प्रत्येक घरोघरी फार उत्साहाने आणि जोशात सुरु असेलच. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी मोदकांच्या नैवेद्यांशिवाय अपूर्णच आहे. मोदक गणपती बाप्पांसहित आपल्या सगळ्यांच्याच (Easy modak shaping tips) आवडीचा पदार्थ. गणेशोत्सवादरम्यान प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मोठ्या आवडीने हौसेने तयार केले जातात. कुणाकडे तळणीचे (Perfectly shaped modak at home) मोदक तयार केले जातात तर कुणाकडे उकडीचे. मोदक कोणत्याही प्रकारचा असो त्याला छान, सुबक, रेखीव अशा कळ्या पडल्या तरच तो दिसायला आणि खायला देखील अप्रतिम लागतो(Handmade modak shaping technique).
घरातल्या प्रत्येकाला मोदक खायला जितके आवडतात तितकेच ते तयार करताना घरच्या गृहिणीची दमछाक होते. मोदक दिसायला सुंदर दिसतात ते म्हणजे त्यांच्या बारीक कळ्यांमुळेच. साच्याचा वापर न करता हाताने कळ्या पाडून तयार केलेले मोदक खूपच सुरेख दिसतात. परंतु मोदकांच्या काळ्या पाडणे म्हणजे जणू एक प्रकारची कलाकुसरच, ती सगळ्यांना अगदी परफेक्ट जमेलच असे नाही. मोदक करताना पारी फाटते, कळ्या बिघडतात, आकार नीट येत नाही. अशावेळी मोदकाच्या कळ्या नीट, परफेक्ट होण्यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात. काही सहज सोप्या अशा ट्रिक्स फॉलो करून आपण मोदकाला सुंदर, सुबक, रेखीव अशा कळ्या पाडू शकता.
मोदकाला सुंदर, सुबक, रेखीव कळ्या पाडण्यासाठी टिप्स...
१. मोदक तयार करण्यासाठी सर्वातआधी उकड काढल्यावर त्याचे छोटे, मध्यम आकाराचे गोळे तयार करुन घ्यावेत. त्यानंतर पोळपाट घेऊन, पोळपाटाच्या बरोबर मधोमध थोडे तेल व्यवस्थित पसरवून लावून घ्यावे. त्यानंतर त्यावर गोळा ठेवून तो पुरी एवढ्या आकाराचा होईपर्यंत व्यवस्थित लाटून घ्यावा. ही पारी व्यवस्थित सगळ्या बाजुंनी एकसमान अशी लाटून घ्यावी.
२. मग ही लाटून घेतलेली मोदकाची पारी हातात घेऊन त्याच्या बरोबर मधोमध सारण भरून घ्यावे. सारण व्यवस्थित भरून घ्यावे. फारच कमी किंवा फार जास्त सारण न भरता पारीचा अंदाज घेऊन सारण भरावे.
३. त्यानंतर, कळ्या करण्यापूर्वी बोटांना थोडे पाणी लावून बोटं हलकीशी ओली करुन घ्यावीत. यामुळे कळ्या करताना पीठ हाताला न चिकटता अगदी परफेक्ट कळ्या करणे सहज शक्य होते.
४. अंगठा, पहिले बोट व मधले बोट या तीन बोटांच्या मदतीने पाकळ्यांना छान सुंदर, रेखीव, सुबक असा आकार देता येतो. अंगठा आणि मधले बोट यांच्या चिमटीत पारी धरुन हलकेच दाब देत कळ्या पाडून घ्याव्यात.
सण - उत्सवाला तळण तर होणारच, कोणतं तेल तळण्यासाठी चांगलं? तेलकट खाऊनही बिघडणार नाही तब्येत..
५. सगळ्या कळ्या पाडून झाल्यावर सगळ्या काळ्या हाताने हलकेच दाब देत मोदक हळूहळू गोलाकार आकारात फिरवत कळ्या एकत्रित आणून मोदकचा वरच्या भागातील शेंडा तयार करून घ्यावा. जर जास्तीचे पीठ शेंड्यावर असेल तर ते काढून पुन्हा हाताने आकार देत व्यवस्थित असा शेंडा तयार करुन घ्यावा.
अशा प्रकारे आपण अगदी झटपट सोप्या पद्धतीने मोदकाच्या सुबक, रेखीव अशा कळ्या झटपट तयार करु शकतो.