Join us

दुधी भोपळ्याची चणाडाळ घालून चमचमीत भाजी, कांदा-लसूण न घालता झटपट करा कुकरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 15:17 IST

easy dudhi chana recipe - see how to cook bottle gourd in a tasty way, healthy food : झटपट करा ही कुकरमधली भाजी. एकदम भन्नाट रेसिपी. नक्की आवडेल.

दुधीची भाजी विविध प्रकारे केली जाते. सगळ्यांनाच दुधी आवडतो असे नाही. मात्र ही एक अशी रेसिपी आहे जी दुधी भोपळा न आवडणाऱ्यांनाही आवडेल. फार चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी नक्की खाऊन पाहा. (easy dudhi chana recipe - see how to cook bottle gourd in a tasty way, healthy food)दुधीत पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही भाजी पचनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होतो. कारण त्यात कॅलरीज एकदम कमी असतात.  दुधी भोपळा शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देण्याचेही काम करतो. यामध्ये अँण्टीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे ही भाजी आहारात असावी.  

चणाडाळ विविध भाज्यांमध्ये घातली जाते. फक्त न भिजवता घालू नका. चणाडाळ शिजायला फार वेळ लागतो. कच्ची खाल्यामुळे पोटाला त्रास होतो.  

साहित्य दुधी भोपळा,  चणाडाळ, तेल, जिरं, तमालपत्र, लाल तिखट, हळद, मीठ, कांदा (नाही घातला तरी चालेल), पाणी, मोहरी

कृती१. दुधी भोपळा सोलून घ्यायचा. त्याचे तुकडे करायचे. मध्यम आकाराचे करा किंवा लहान करा. कांदा बारीक चिरुन घ्यायचा. चणाडाळ भिजत घालायची. किमान तासभर तरी भिजत घाला. 

२. एका कुकरमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घालायचे आणि जिरे फुलल्यावर त्यात तमालपत्र घालायचे. फोडणी छान परतून घ्यायची. फोडणी परतून झाल्यावर त्यात दुधी भोपळ्याचे तुकडे घालायचे आणि मग त्यात कांदा घालायचा. मस्त परतायचा. मग त्यात भिजवलेली चणाडाळ घाला. 

३. चवी पुरते मीठ घाला. चमचाभर हळद घाला. चमचाभर लाल तिखट घाला आणि मग भाजी परतून घ्यायची. त्यात थोडे पाणी घालायचे. कुकरचे झाकण लावायचे आणि भाजी मस्त शिजवून घ्यायची. छान एकजीव आणि मऊसर अशी होते. चवीला एकदम छान लागते. कुकर उघडल्यावर त्यातील पाणी जर जास्त शिल्लक असेल तर पाणी आटवून घ्या. एक उकळी काढून घ्या. छान घट्ट आणि रसदार अशी ही भाजी होते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स